मुंबई : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’ चं हे 16वं (Bigg Boss 16) पर्व सुरु आहे. यंदाच्या पर्वात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानही (Sajid Khan) सहभागी झाला आहे. परंतु, मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिदला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून प्रेक्षक फारसे खूश नाहीत. आता नेहमीच चर्चेत असणार अभिनेत्री उर्फी जावेदनेसुद्धा (Urfi Javed)  यावर संताप व्यक्त केला आहे.


आणखी वाचा : करिअरच्या शिखरावर अभिनेत्यानं का घेतला आश्रमात टॉयलेट साफ करण्याचा निर्णय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून नाखूश असल्याचं सांगत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली. 'बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वासाठी मला विचारण्यात आलं नाही. पण जरी मला ऑफर आली असती, तरी मी गेले नसते. लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचं समर्थन करणं, आपण थांबवू शकत नाही का? ज्या महिलांचं त्याने(साजिद खान) शोषण केलं आहे. त्या महिलांना रोज त्याला टीव्हीवर पाहून काय वाटत असेल, याची कल्पनाही करता येत नाही', असं उर्फी म्हणाली आहे.


आणखी वाचा : फॅशनच्या चक्करमध्ये प्रियांका झाली Oops Moment ची शिकार, पाहा फोटो



आणखी वाचा : 'विमानात केली मारहाण, मुलाचाही दाबला गळा...,' 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं केले धक्कादायक आरोप


उर्फीनं पुढे शेहनाज गिल साजिदबद्दल बोलत असतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. 'महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना पाठिंबा देणं आपण थांबवलं पाहिजे. तुम्ही सगळे त्याला हिरो बनवत आहात. कोणत्या चित्रपटातून त्याने हसवलं आहे? त्यापेक्षा जास्त त्यानं महिलांना रडवलं आहे', असं म्हणत उर्फीनं साजिदला पाठिंबा देणाऱ्या शहनाज आणि इतरांबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Urfi Javed Gets Angry After Seeing Bollywood Director Sajid Khan In Bigg Boss 16) 


आणखी वाचा : 'बुरखा, हिजाब, लव्ह जिहाद...', रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी दिल्या विचित्री शुभेच्छा!



आणखी वाचा : एक दोन नाही तर, 17 मिनिटं चालला राम कपूर- साक्षी तंवर यांचा इंटीमेट सीन, प्रेक्षकांकडून संताप व्यक्त


पुढे उर्फी म्हणाली, 'शहनाज गिल आणि कश्मिरा शाहसारख्या महिला साजिद खानचं समर्थन करत असतील तर मलाही त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे', असंही उर्फी म्हणाली आहे. दरम्यान, 2018 मध्ये साजिद खानवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.