Urfi Javed Transparent Bikini : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेला होता. उर्फी ही अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. कोण काय बोलले त्याची उर्फीला चिंता नसते तिला जे करायचं ते बिनधास्तपणे उर्फी करत असते. उर्फी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत उर्फीनं ट्रान्सपरेंट बिकीनी परिधान केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीनं हिरव्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. मात्र, तिनं परिधान केलेली ही बिकिनी ट्रान्सपरेंट आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीन कॅप्शन दिलं की मी अशी उठले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, इतकीच मज्जा येते तर उरलेले हे कपडे पण का परिधान केले आहेस. दुसरा नेटकरी म्हणाला, ही बेशरम आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, हिचा हा व्हिडीओ पाहून माझा दिवस खराब झाला. आणखी एक नेटकरी म्हणाला, का कोणी चोरी करून घेऊन गेलं का तुझा नाईट ड्रेस. दुसरा नेटकरी म्हणाला, आता हिनं हद्दच पार केली, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केलं आहे. 


खरंतर उर्फी जेव्हापासून प्रसिद्धीच्या झोतात आली, तेव्हापासून सगळे तिला जावेद अख्तरची नात असल्याचे म्हणत आहेत. काहींना वाटते की ती जावेद साहेबांची नात आहे, तर काहींना वाटते की ती त्यांची नात आहे. याच कारणामुळे काही महिन्यांपूर्वी उर्फी विमानतळावर टी-शर्ट घालून दिसली होती, ज्यावर जावेद अख्तर तिचे आजोबा नाहीत असे तिनं लिहिले होते.


हेही वाचा : Mayilsamy Death : Jr NTR च्या भावानंतर या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन


दरम्यान, उर्फीनं एकदा जावेद अख्तर यांच्यासोबत एक फोटो शेअर करत मी माझ्या आजोंबा भेटली असे कॅप्शन दिले होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. उर्फी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.