Mayilsamy Death : चित्रपटसृष्टीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. बॉलिवूडपासून दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला हे म्हणायला हरकत नाही 'मिर्झापूर' आणि 'अलिफ लैला' अभिनेता शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर ज्युनियर एनटीआरचा (Jr NTR) चुलत भाऊ तारक रत्न (Tarak Ratan) यांचेही निधन झाले. चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीलाही या दुःखातून सावरता येत नसताना, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदवीर अभिनेता आर. के. मायिलसामी (R. K. Mayilsamy) यांचे निधन झाले आहे. मायिलसामी यांनी आज 19 फेब्रुवारी रोजी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर मायिलसामी यांच्या निधनाची बातमी दिली. मायिलसामी यांना काही ठीक वाटत नव्हते त्यानंतर कुटुंबानं त्यांना लगेचच रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तेथे पोहचण्यात त्यांना उशिर झाला आणि मायिलसामी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Late Actor #Mayilsamy 's last video..
He felt discomfort.. As his family took him to Porur Ramachandra Hospital, he passed away on the way itself..
Later, Doctors confirmed..
He was busy with several movies..
He was first one TV Channels call, when legends pass away.. RIP! https://t.co/r8MQpv2kwy
— Ramesh Bala (@rameshlaus) February 19, 2023
रमेश बाला यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर कुटुंबीयांनी मायिलसामी यांना तातडीने पोरूर रामचंद्र रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यानंतर डॉक्टरांनीही मायिलसामी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. मायिलसामी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते डबिंग स्टुडिओमध्ये त्यांच्या आगामी 'ग्लासमेट' चित्रपटासाठी डब करताना दिसत आहे.
நகைச்சுவை நடிப்பில் தனக்கென்று ஒரு பாணியை முன்னிறுத்தி வெற்றி கண்டவர் நண்பர் மயில்சாமி. உதவும் சிந்தையால் பலராலும் நினைக்கப்படுவார். அன்பு நண்பருக்கென் அஞ்சலி #Mayilsamy
— Kamal Haasan (@ikamalhaasan) February 19, 2023
मायिलसामी यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला खूप मोठा धक्काबसला आहे. कमल हसन (Kamal Haasan) यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मित्र मायिलसामी यांच्या निधनानं शोक झाल्याचे व्यक्त केले आहे.
Versatile Actor #Mayilsamy ( @mayilsamyR ) Finish his Dubbing for #Glassmate Movie
RELEASING SOON @angaiyarkannan1@Rajsethupathy1 @actressbrana @santhoshchoreo @dnextoff @teamaimpr pic.twitter.com/WgSvAN5bm3
— D Next (@dnextoff) February 18, 2023
मायिलसामी यांच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आता पर्यंत 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. कंचना (2011), वेदालम (2015), गिल्ली (2004), वीरम (2014), कंचना-2 (2015), कसू मेला कसू (2018) या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मायिलसामी यांनी विरुगंबक्कम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून 2021 ची विधानसभा लढवली होती. मायिलसामी हे केवळ विनोदी कलाकारच नव्हते, तर त्यांनी अनेक अप्रतिम भूमिकाही साकारल्या आहेत. मायिलसामी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शो देखील केले. त्यांनी Lollupa चे सुत्रसंचालन देखील केले होते.