मुंबई : नेहमीच उर्फी जावेद तिच्य अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते.  मात्र उर्फी जावेद यावेळी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रीला पोलिसांची मस्करी करणं महागात पडलं आहे. काल तिच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी  तिच्या घरातून बाहेर पडताच  पोलिस महिला अधिकारी तिला अटक करतात.व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी उर्फीला तिच्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगतात. उर्फीने त्या पोलिसांना अटक करण्यामागचं कारण विचारल्यावर पोलिस अधिकारी म्हणतात, 'इतके छोटे कपडे घालून कोण फिरतं?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वेळातच उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडिओमागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आता मुंबई पोलिसांनी अधिकृत निवेदनात स्पष्ट केलं आहे की व्हिडिओमध्ये दिसणारे पोलिस अधिकारी खरे पोलिस कर्मचारी नाहीत.


मुंबई पोलिसांनी X वर शेअर केलेल्या निवेदनात लिहिलं आहे की, 'स्वस्त प्रसिद्धीसाठी कोणीही कायद्याशी खेळू शकत नाही. लहान कपडे परिधान केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिलेला अटक केल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा आहे. पोलिसांच्या गणवेशाचा आणि मानचिन्हाचा गैरवापर झाला आहे.


आता गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवेदनात पुढे असंही म्हटलं आहे की, 'ओशिवरा पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 171, 419, 500, 34 अंतर्गत दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बनावट अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यांचं वाहनही जप्त करण्यात आलं आहे.



व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फी लाल बॅकलेस टॉपमध्ये दिसली होती ज्यामध्ये तिने डेनिम पँट घातली होती.  उर्फी जावेद अलीकडे तिच्या फॅशनमुळे अडचणीत आली होती. गेल्या महिन्यात तिच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिला तिच्या फॅशन सेन्समुळे लोकांच्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे.