मुंबई : उर्फी जावेद तिच्या आउटफिट्समुळे अनेकदा हेडलाईन्समध्ये असते.  याआधी एअरपोर्टवर वेगळ्याच आउटफिटमध्ये दिसली. तिच्या सुपरकूल डेनिम जॅकेटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. क्रॉप टॉप असलेल्या डेनिम जॅकेटमुळे उर्फीची ब्रा पण दिसत होती. तिच्या या पिंक ब्रामुळे चांगलीच ट्रोल झाली होती. स्टाइलचे कपडे कधी तुम्हाला धोका देतील हे सांगणं तसं कठीणच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांना हा लूक आवडला नाही
उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीचा भाग राहिली आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे हेडलाईन्समध्ये असते. अलीकडे ती जांभळ्या रंगाच्या पोशाखात दिसली आणि लूकसाठी तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातये. उर्फी पापाराझींसोबत बोलताना म्हणाली, ''यावेळी मी ब्रालेट स्टाईल टॉप घातला आहे. त्यावर एक कट टी-शर्ट देखील मी घातलं आहे.'' उर्फीचा हा टी-शर्ट वाऱ्यामुळे उडत होता, 


मात्र या कपड्यांमध्ये ती थोडी अनकंफर्टेबल दिसत होती आणि तिचा टॉप हाताळण्याचा प्रयत्नही करत होती. तिच्या या व्हायरल व्हिडिओला जोरदार ट्रोल केलं जात आहे. त्याचवेळी, एका युजर्सने लिहिलं आहे की, ''उर्फी खूप चांगली दिसते. पण स्टाईल सेन्समुळे सगळं काही गडबडतं, कोणीतरी तिला सेलिब्रिटी स्टाईल सुचवा'' अशा प्रकारच्या कमेंटचा तिच्यावर वर्षाव होतोय.



या शोमध्ये दिसली उर्फी जावेद
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे आणि रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत राहते. टीव्ही शोबद्दल बोलताना, उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. याशिवाय, उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीचा भाग बनली पण 8 व्या दिवशी बेदखल झाली.