मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed ) बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं. उर्फीचं वेगळेपण म्हणजे तिचा फॅशन सेन्स. बिग बॉसच्या घारतून बाहेर आल्यानंतर ती कायम तिच्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत आली. काही युझरना तिचा फॅशन सेन्स आवडतो, पण काही मात्र उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसमुळे  ट्रोल करतात. उर्फीला ज्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता देखील उर्फी तिच्या काळ्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता उर्फीने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये ती काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. गाऊनला मोठ-मोठे कट आहेत. त्यामुळे उदरांनी मोठा चावा घेवून ड्रेस डिझाईन केला का? असा प्रश्न अनेक युजर्सने उर्फीला विचारला आहे. तरी काही युजर्सने उर्फीच्या घरात जास्त उंदिर आहेत.. अशी कमेंट केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Urrfii (@urf7i)


सध्या उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर जेव्हा उर्फी जावेदला समजले की ती तिच्या फॅशन सेन्समुळे लोकप्रिय होऊ शकते. तेव्हापासून तिने फॅशन दाखवण्याची एकही संधी सोडलेली नाही. उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे कायम चर्चेत असते.