मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed ) बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं. उर्फीचं वेगळेपण म्हणजे तिचा फॅशन सेन्स. बिग बॉसच्या घारतून बाहेर आल्यानंतर ती कायम तिच्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत आली. काही युझरना तिचा फॅशन सेन्स आवडतो, पण काही मात्र उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसमुळे  ट्रोल करतात. पण आता उलटं झालं आहे. ट्रोलर्स आता उर्फीला ट्रोल नाही तर तिचं कौतुक करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती साडी आणि वेग-वेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती पूर्णपणे पारंपरिक अंदाजात दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्फीच्या या व्हिडिओवर पहिल्यांदाच तिला ट्रोल केले जात नसून चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहेत. कमेंट्समध्ये चाहते ब्यूटीफुल, गोर्जियस आणि लवली लिहित आहेत.  तर एका चाहत्याने लिहिलं की, 'गजब लग रही हो...'


सध्या उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर जेव्हा उर्फी जावेदला समजले की ती तिच्या फॅशन सेन्समुळे लोकप्रिय होऊ शकते. तेव्हापासून तिने फॅशन दाखवण्याची एकही संधी सोडलेली नाही. उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे कायम चर्चेत असते.