जेव्हा Urfi Javed चा फोटो अडल्ट साईटवर अपलोड झाला होता, काय होतं संपुर्ण प्रकरण?
अडल्ट साईटवर उर्फी जावेदचे फोटो अपलोड झाल्यावर वडिलांची रिअॅक्शन काय होती? तुम्हाला माहितीय हा किस्सा
मुंबई : अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोजमुळे आणि हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती एका किस्स्यामुळे चर्चेत आली आहे. हा किस्सा एकून अनेकांना धक्का बसला आहे. नेमका हा किस्सा काय आहे तो जाणून घेऊयात.
उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या मुलाखतीतला एक किस्सा सांगितला आहे. या मुलाखतीत उर्फीने सांगितले होते की, कोणीतरी तिचे फोटो अॅडल्ट साइटवर म्हणजेच पॉर्न साइटवर अपलोड केले होते. उर्फीने या प्रकरणावर तिच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली होती? व ते प्रकरण कस शांत झालं होत याची माहिती दिली होती.
वडिल काय म्हणाले होते?
उर्फी जावेद (Urfi Javed) त्या प्रकरणावर म्हणाली की, ती मुस्लिम कुटूंबातून येते. जेव्हा तिच्या कुटुंबाला पॉर्न साइटवर फोटो अपलोड झाल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. उर्फीने पुढे सांगितले की, तिच्या वडिलांना याचा खूप राग आला होता. तब्बल दोन वर्ष तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. यावेळी त्याचे मित्र आणि नातेवाईकही त्यांच्याबद्दल वाईट बोलायचे,असेही तिने सांगितले.
उर्फीचा (Urfi Javed) फॅशन सेन्स खूपच बोल्ड आहे. कधी ती फक्त सिल्व्हर वर्कमध्ये तर कधी सेफ्टी पिनच्या ड्रेसमध्ये कॅमेऱ्यात मोकळेपणाने पोज देताना दिसते. अनेक लोक तिच्या बोल्ड स्टाईलचे चाहते आहेत, तर उर्फीला तिच्या विचित्र लूकसाठी ट्रोल करणारे बरेच लोक आहेत.