मुंबईः उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे ट्रोल होते मात्र यावर तिचा फारसा फरक पडत नाही. आता उर्फीने तिचा असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेदच्या प्रत्येक  व्हिडिओची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. उर्फीने नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करताच, काही मिनिटांतच तो व्हायरल होतो. आता पुन्हा एकदा उर्फीने तिच्या ड्रेसवरून असाच काहीसा प्रकार केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.



उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याचा लेटेस्ट लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये उर्फी जावेद खास ब्रासह ट्रान्सपरंट स्कर्टमध्ये दिसत आहे....उर्फीने घातलेली ब्रालेट सामान्य नसून ती समुद्रकिनारी सापडणाऱ्या शिंपल्यापासून तयार केलेली आहे..तर त्याखाली ट्रान्सपरंट स्कर्ट घालून उर्फीने समुद्रकिनारी हे फोटोशूट केलं आहे.


आणखी सेक्सी लूक देण्यासाठी उर्फीने कमरेला पारदर्शक कपडा गुंडाळला आहे. समुद्रकिनारी केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये उर्फी अतिशय स्टाईलमध्ये तिचा लूक फ्लॉंट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्फी अतिशय सुंदर लूक देत आहे. हा व्हिडीओ पोस्ट होताच इंटरनेटवर खळबळ माजली असून अनेकांकडून उर्फीच्या या प्रयोगाला पसंती मिळत ​​आहे तर अनेकांनी तिला कपड्यांवरून ट्रोल केलं आहे.


उर्फीच्या या अत्यंत बोल्ड कपड्यांमुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तुला कपड्यांचं वावडं आहे का असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


उर्फी जावेदचे नुकतेच इंस्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्त तिनं आपल्या मित्रांसोबत गोव्यात पार्टी करून हा आनंद साजरा केला.