Urfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, `फायनली आजोबांना भेटले...`
Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
Urfi Javed shared post with javed akhatar : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. इतकं सुरु असताना उर्फीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यावेळी उर्फीनं तिच्यासोबत दिसणाऱ्या व्यक्तीला आजोबा म्हटले आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून जावेद अख्तर (Javed Akhtar) आहे आणि त्यामुळेच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उर्फीनं हा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती जावेद अख्तरसोबत दिसत आहे. या फोटोत उर्फीनं निळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. हा फोटो शेअर करत उर्फीनं लिहिलं की 'शेवटी मी माझ्या आजोबांना भेटलो.' हसतानाचा इमोजी शेअर करत उर्फी म्हणाली, ते देखील एक दिग्गज आहेत, सकाळी खूप लोक सेल्फी घेण्यासाठी रांगेत उभे होते, पण त्यांनी कोणालाही नाही म्हटले नाही, मस्त हसले आणि सर्वांशी गप्पा मारल्या. ते खूप विनम्र होते! मी खूप आनंदी आहे.'
खरंतर उर्फी जेव्हापासून प्रसिद्धीच्या झोतात आली, तेव्हापासून सगळे तिला जावेद अख्तरची नात असल्याचे म्हणत आहेत. काहींना वाटते की ती जावेद साहेबांची नात आहे, तर काहींना वाटते की ती त्यांची नात आहे. याच कारणामुळे काही महिन्यांपूर्वी उर्फी विमानतळावर टी-शर्ट घालून दिसली होती, ज्यावर जावेद अख्तर तिचे आजोबा नाहीत असे लिहिले होते. आता उर्फी जेव्हा जावेद अख्तर यांना भेटली तेव्हा तिनं ही मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : Video : 'उंच पत्नी नाही...', Shahrukh Khan बिग बींना असं का म्हणाला?
काही दिवसांपूर्वी उर्फीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उर्फीने गंभीर विधान केले आहे. “राजकीय नेत्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण, ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे”, असं गंभीर विधान उर्फी जावेदने केलं आहे.