नेहमी अर्ध्या कपड्यात असणाऱ्या उर्फीने पूर्ण कपडे घातले म्हणून चाहत्यांकडून ट्रोल
उर्फी जावेद तिच्या आउटफिट्समुळेही कायम हेडलाईन्समध्ये राहिली आहे.
मुंबई : उर्फी जावेद बिग बॉस ओटीटी मधून बाहेर आली आहे. ती तिच्या आउटफिट्समुळेही कायम हेडलाईन्समध्ये राहिली आहे. आता तिने आपल्या घराच्या गणपती स्थापनेचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर उर्फीला ट्रोल केलं जात आहे. लोकांनी मुस्लीम असल्यानं गणपतीची पूजा करण्याबद्दल वाईट कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर कपड्यांवरही अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. उर्फीने काही लोकांना चोख प्रत्युत्तरही दिलं आहे.
पहिल्यांदा उर्फीच्या घरी गणपती आला
उर्फी जावेद इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिने बिग बॉस ओटीटी मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. बिगद बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ती तिच्या एअरपोर्टवरील लूकमुळे चर्चेत होती. तिला खूप ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. आता उर्फीने गणपती स्थापनेचे फोटो पोस्ट केले आहेत. उर्फीने लिहिलं आहे की, माझ्या घरचा पहिला गणपती. गणपती बाप्पा मोरया.
लोकांनी पोस्टवर कमेंट्स केल्या
उर्फीच्या फोटोलर लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंटमध्ये लिहीलं आहे की, तुम्ही मुस्लिम आहात, नाही का? तर एकाने कमेंटमध्ये लिहीलं आहे की, तसं, गणपतीजींसमोर पूर्ण कपडे घालणं तुम्हाला विचित्र वाटत असेल, तुम्ही या फोटोमध्ये सगळ्यात जास्त कपडे घातलेलं पाहिलं असेल. उर्फीने या कमेंटला उत्तर दिलं आहे आणि म्हटलं आहे की, मी पाहिलं की, तुम्हालाही पत्नी आहे. गरीब स्त्री, सर्वशक्तिमान तिला शक्ती देवो.
जावेद अख्तर यांच्या नावाने लोकांनी केलं होतं ट्रोल
अलीकडेच उर्फी जावेद क्रॉप जॅकेट घालून एअरपोर्टवर गेली. तिच्या या गेटअपमुळे ती खूप ट्रोल झाली होती. लोकांनी तिला जावेद अख्तर यांची नात म्हणत अनेक नकारात्मक कमेंट केल्या होत्या. यानंतर शबाना आझमी यांनी ट्वीट केलं होतं की, तिचा उर्फी जावेदशी कोणताही संबंध नाही.