Urfi Javed Supports Protesting Wrestlers : गेल्या महिनाभरापासून कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलन करत होते. आधी त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं. तर काल कुस्तीपटूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या तिघांनीही सोशल मीडियावर एकसारखेच ट्वीट करत आपली याविषयीची भूमिका मांडली होती. त्यानुसार हे कुस्तीपटू पदकं गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे पोहोचले होते. भारतीय किसान संघटनेने समजूत घातल्यानंतर अखेरच्या क्षणी त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्याचवेळी कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला आणखी पाच दिवसांची मुदत दिली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोणी सेलिब्रिटी समोर येत नसले तरी देखील कोणालाही अपेक्षा नसलेली उर्फी जावेद मात्र, त्यांना पाठिंबा देत पुढे आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीता आणि विनेश फोगाट यांचा एक मॉर्फ्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून नक्की खरा कोणता आहे आणि खोटा कोणता हे अनेकांना कळत नाही आहे. तर उर्फीनं हाच फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. हा फोटो शेअर करत उर्फी म्हणाली की "हे ते लोक आहेत असत्यला सत्य आहे हे दाखवून देण्यासाठी अशा प्रकारे एडिटिंग करतात. हे करण्याची काय आवश्यकता आहे? कोणाला खोटं ठरवण्यासाठी इतक्या खाली जाण्याची काय गरज आहे? कोणाला खोटं ठरवण्यासाठी इतकं खाली जाण्याची गरज नाही की असत्याचा आधार घ्यावा लागेल."



उर्फीप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं देखील कुस्तीपटुंना पाठिंबा दिला आहे. हे  स्वराने साक्षी मलिकचं ट्वीट रिट्वीट केलं होतं. "आपलं सरकार बलात्कार करणाऱ्या एका व्यक्तीला संरक्षण देत आहे, याची मला लाज वाटते. या लज्जास्पद भारतात आम्हाला फाशीवर लटकवा,” असं स्वरा म्हणाली.



हेही वाचा : Wrestlers Protest: ...तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिरंग्याशिवाय आखाड्यात उतरणार भारतीय खेळाडू; 'युनायटेड वर्ल्ड रेसलिंग'चा इशारा


ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी भारतीय कुस्तीपटू एका महिन्याहून अधिक काळ जंतरमंतरवर आंदोलन करीत होते. रविवारी निदर्शकांची धरपकड करत दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवरून हटविले. सात तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले असले तरी काही आघाडीच्या कुस्तीगिरांसह अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. काल गंगेत पदक विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो पाठिराखेही हरिद्वारला पोहोचले होते. या कुस्तीगीरांची आयुष्यभराची मेहनत आणि संपूर्ण आयुष्य म्हणजे त्यांचे पदके हातात धरून ते जवळपास तासभरापेक्षा जास्त वेळा बसले होते. त्या सगळ्यांना हे पाहून अश्रु अनावर झाले. फक्त कुस्तीपटू नाही तर तिथे उपस्थित असलेले सगळेच आणि त्यासोबत त्यांना टिव्हीवर पाहणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही अश्रु अनावर झाले. किसान संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी मध्यस्थी केल्यानंतर कुस्तीपटूंनी सरकारला पाच दिवसांची वेळ दिली आहे