मुंबई : उर्फी जावेद तिच्या अतरंगी शैलीसाठी ओळखली जाते. प्रत्येकवेळी ती तिच्या ड्रेसवर असे प्रयोग करते की पाहून तिचे चाहतेही थक्क होतात. आता उर्फीने आपल्या शरीराबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये उर्फीने तिच्या शरीराचा एक भाग पूर्णपणे बनावट असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेदने केला खुलासा
वास्तविक, नुकतीच उर्फी जावेद या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कट ड्रेस घालून पोहोचली होती. यादरम्यान उर्फी खूपच सुंदर दिसत होती. कार्यक्रमात उर्फीला पावसाळ्यात खाण्यापिण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उर्फीने सांगितलं की, तिचे सगळे दात बनावट असल्याने ती कॉर्न खात नाही. उर्फी म्हणाली, "जर मी कॉर्न खाल्ले तर माझे सर्व दात तुटतील कारण ते सर्व दात खोटे आहेत." मात्र, यानंतर उर्फीने सांगितले की तिला खाण्याची खूप आवड आहे. 


चाहते आश्चर्यचकित 
उर्फीचे हे सत्य जाणून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरं तर, नायिका अनेकदा हेअर एक्स्टेंशन, नेल एक्स्टेंशन आणि सौंदर्यासाठी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात, परंतु उर्फीचे सर्व दात बनावट असल्याचं प्रथमच सर्वांना समजलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्फी जावेद बुधवारी मुंबईतील अंधेरी भागात दिसली. जिथे तिचा ड्रेसिंग सेन्स पाहून सगळेच दंग झाले. यावेळी उर्फीने कॉलरच्या खालून कट केलेला ड्रेस घातला आणि बरीच हेडलाईन्स बनवली. उर्फीचा हा ड्रेस तिच्या डिझायनरने पूर्णपणे वेगळा बनवला होता.