बर्थडे सेलिब्रेशनसाठी उर्फी खास डेस्टिनेशन, एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली
उर्फी वाढदिवसाच्या निमित्तानं एअरपोर्टवर स्पॉट झाली.
Urfi Javed Spotted: आपल्या विचित्र फॅशननं सगळ्यांनाच घायाळ करणाऱ्या उर्फी जावेदचा (Urfi Javed) एक नवा लुक समोर आला आहे. हा लुक पाहून सगळ्यांचा धक्काच बसला असून यावेळी या लुकवरही उर्फी जबरदस्त ट्रोल होत आहे. खरंतर उर्फी आणि ट्रोलिंग (Urfi Javed Trolling) हे समीकरण तसं काही नवीन नाही आता हे कळून चुकले आहे की तिनं काहीही करण्याचा प्रयत्न जरी केली तरी उर्फी ट्रोलिंगपासून काही वाचू शकतं नाही. (urfi javeds new look shocks everyone video goes viral)
उर्फी जावेदपेक्षा सध्या सोशल मीडियावर तिच्या एका नव्या लूकचाच बोलबाला आहे. तिची ड्रेसिंग स्टाइल अनोखी आणि विचित्र आहे हे सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. आता कल्पना करा की तिच्या बोल्ड आउटफिटनं सगळ्यांचेच होश उडवणारी उर्फी जर डोक्यापासून पायापर्यंत कपड्यांनी झाकलेली दिसली तर चर्चा होणारच नाही का?
जेव्हा उर्फी विमानतळावर स्पॉट (Urfi Javed Spotted) झाली तेव्हा तिला पाहून कोणीही तिला ओळखू शकलं नाही आणि ज्यांनी तिला ओळखलं ते उर्फीचा हा लूक पाहून आश्चर्यचकित झाले. उर्फी वाढदिवसाच्या निमित्तानं एअरपोर्टवर स्पॉट झाली होती.
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
उर्फी जावेद आज मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली, आपल्या वाढदिवसानिमित्त ती कुठल्यातरी ड्रीम डेस्टिनेशनला गेली असल्याचं समजतंय. ती गाडीतून खाली उतरली आणि तिला पाहून सगळे थक्क झाले. उर्फीने पूर्ण जीन्स, फुल टी-शर्ट आणि त्यावर ब्लेझर घातले होते, इतकेच नाही तर उर्फी जावेदने मास्कने तोंड झाकले होते. होय... आपल्या बोल्ड लूकने अनेकदा दहशत निर्माण करणारी उर्फी जावेद चेहऱ्यापासून संपुर्ण शरीर झाकताना दिसली.
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
इतकंच नाही तर उर्फी जावेदला या लूकमध्ये पाहून लोकांचीच झोप उडाली आहे, तशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटतं आहेत. यावेळी उर्फीचा घसाही बसला होता. उर्फी तिच्या वाढदिवसापूर्वी काहीतरी स्पेशल सेलिब्रेट करण्यात व्यस्त असल्याचे दिसले.
सोशल मीडिया क्वीन उर्फी जावेद 15 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस (Urfi Javed Birthday) साजरा करणार आहे आणि यावेळी तिच्या वाढदिवसामुळे सोशल मीडियावर तिचाच बोलबाला आहे. विशेषत: या खास दिवशी तिचा लूक कसा असेल याची सर्वाधिक चर्चा होत आहे.