मुंबई : विक्की कौशलच्या अभिनयाने सजलेल्या उरी : द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमाने एक आठवडा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. सुरूवातीपासूनच हिट झालेल्या या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर साऱ्यांचच लक्ष आहे. आता हा सिनेमा १०० करोड रुपयांचा आकडा गाठणार आहे. विकेंडला देखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. त्यामुळे १०० करोड गाठणं या सिनेमासाठी आता कठीण राहिलेलं नाही. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी सिनेमाने जवळपास ८ करोडचा गल्ला जमवला होता. ज्यानंतर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. एवढंच नव्हे तर आता या सिनेमाला दुसऱ्या शुक्रवारचा देखील अधिक फायदा झाला आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की, तिकिट खिडकीवर उरीला भरघोस प्रतिक्रिया मिळत आहे. गुरूवारचं कलेक्शन त्यामध्ये मिळवलं तर आतापर्यंत ७०.९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शुक्रवारी या सिनेमाने 8 करोडचा बिझनेस केला आहे. अशा प्रकारे उरीने आतापर्यंत ७९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



असं म्हटलं जातं आहे की, हा सिनेमा दुसऱ्याच आठवड्यात  १०० करोड रुपयांचा आकडा गाठेल. अनेक ठिकाणी ओपनिंग डेपेक्षा सिनेमा आता चांगली कमाई करत आहे. सकाळच्या शोला तसा प्रतिसाद कमी आहे. २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा ८०० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. 


सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या आतंकवादी हल्याच प्रतिउत्तर म्हणून भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राइक केलं यावरच आधारित हा सिनेमा आहे. उरीसोबत प्रदर्शित झालेल्या अनुपम खेर यांच्या द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर या सिनेमाची खूप वाईट अवस्था आहे. 30 करोड रुपयात तयार केलेल्या या सिनेमाने आतापर्यंत फक्त 16-17 करोड रुपयांची कमाई केली आहे.