मुंबई : काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर मानसीने आपण वेगळे होत असल्याचं स्पष्ट केलं. मानसी आणि तिच्या पतीमध्ये काही ठिक चालत नसल्याच्या बातम्या अनेकरदा समोर येत होत्या. मानसीच्या घटस्फोटोची चर्चा संपता न संपता आता अभिनेत्री उर्मिला कोठारेने एक वक्तव्य केलं आहे.  आता तुम्हाला ही बातमी वाचून थोडा धक्का बसेल की, उर्मिला कानिकटकरच्या सुखी संसारात आता काय नवीन वादळ आलंय? पण आज आम्ही तुम्हाला उर्मिलाच्या एका वक्तव्याबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. आता या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेच्या वक्तव्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 


प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या शोमध्ये उर्मिलाला विचारण्यात आलं की, प्रेम म्हणजे काय? या प्रश्नावर उत्तर देत उर्मिला म्हणाली की, मैत्री आणि विश्वास यानंतर तिला पुढे विचारण्यात आलं की, पण जर त्याच प्रेमाने जखम दिली तर? यावर उर्मिला म्हणते, दुसरं प्रेम शोधायच' उर्मिलाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.तिच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा तिच्या आणि आदिनाथच्या नात्यावर युजर्स चर्चा करताना दिसत आहेत. पण यावर कधीही आदिनाथ किंवा उर्मिलाने दुजोरा दिलेला नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मात्र गेल्या काहि दिवसांपुर्वी उर्मिला आणि आदिनाथ कोठारेमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात होत. पण काहीच दिवसात ही चर्चा अफवा असल्याचं स्वत: आदिनाथने सांगितलं होतं.   या जोडीनं २०११ मध्ये सप्तपदी घेतली. अर्थातच या नातं जुळलं ते  महेश कोठारे यांच्या 'शुभमंगल सावधान' या सिनेमाच्या सेटवर. या सिनेमामुळे आदिनाथ-उर्मिलाची लव्हस्टोरी सुरु झाली. यानंतर एक दोन वर्षात दोघांचं 'शुभमंगल' पार पडलं.. या गोड जोडीला एक गोंडस मुलगी आहे. उर्मिला-आदिनाथ मुलीसोबतचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. 


उर्मिला-आदिनाथच्या घटस्फोटाच्या चर्चा का रंगल्या? 
'चंद्रमुखी' सिनेमाच्या प्रमोशनला उर्मिला कोठारेने कुठेच हजेरी लावली नव्हती. सोशल मीडियावरुनदेखील उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो केलं होतं. तसेच एकाच सोसायटीत राहून दोघे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते. उर्मिलाच्या वाढदिवशी आदिनाथने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. अशा अनेक कारणांमुळे उर्मिला आणि आदिनाथच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या.