मुंबई : मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्मिला ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्मिला कोठारे ही सायबर क्राइमची (Cyber Crime) शिकार होता होता वाचली आहे. डिजीटल गोष्टींमुळे कोणतही काम करणं सोपं झालं आहे. पण दुसरीकडे सोशल मीडियामुळे गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा शिकार ही आघाडीची अभिनेत्री झाल्याचे तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिलानं या विषयी माहिती देत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्मिलानं तिला आलेला एक मेसेज शेअर केला आहे. हा एक फ्रॉड मेसेजचा स्क्रीनशॉट आहे. त्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्ही एचडीएफसी बॅंकेतील खात्याची केवायसी अपडेट केलेली नाही. त्यामुळे तुमचं खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.' 


हा स्क्रिनशॉट शेअर करत काय म्हणाली उर्मिला


'मला नुकताच असा एक मेसेज आला आहे. बऱ्याचदा असे मेसेज वाचल्यानंतर लोक घाबरतात आणि अशा लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे तुम्हीच तुमच्या खासजी गोष्टींची माहिती फ्रॉड करणाऱ्या लोकांना देता. त्यामुळे तुमचं बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकतं. मला आलेल्या मेसेजमधली लिंक मी पाहिली पण त्यात एचडीएफसी बॅंकेचं पूर्ण नाव लिहिली देखील नाही. त्यामुळे मला शंका आली. मित्रांनो माफ करा. तुमचं नशिब यावेळी खराब आहे.'



उर्मिलानं हा फ्रॉड मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत चाहत्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमी तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या लिंक आधी तपासा आणि मग क्लिक करा असा संदेश तिनं दिला आहे. उर्मिलानं 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. येथेच उर्मिला आणि आदिनाथची भेट झाली आणि बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेतल्या. तर 'असंभव' या मालिकेतून उर्मिला घराघरात पोहोचली आणि तिनं लाखो लोकांची मने जिंकली. (urmila kothare was a victim of cyber crime shared screenshot of the message)