Happy Birthday Urmila Matondkar: Bollywood Director च्या पत्नीने उर्मिला मातोंडकरला लगावली होती कानाखाली, नेमकं कारण काय?
1990 च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिला आपल्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली होती. एकदा एका बॉलिवूड दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिलाच्या कानाखाली लगावली होती.
Urmila Matondkar Birthday: 1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये ज्या अभिनेत्रींचा दबदबा होता त्यातील एक नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आहे. उर्मिला मातोंडकरने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिलाने फक्त हिंदीच नव्हे, तर तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिला रंगीला (Rangeela) गर्ल नावानेही ओळखलं जातं. उर्मिला आपल्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली होती. उर्मिला आज आपला 49 वा वाढदिवस (Urmila Matondkar Happy Birthday) साजरा करत आहे.
उर्मिलाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी निगडीत असाच एक किस्सा आज जाणून घेणार आहोत. उर्मिलाचा 'रंगीला' चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर बॉलिवूडमध्ये उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागली होती.
'द्रोही' चित्रपटात एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान रामगोपाल वर्माला उर्मिलाचा डान्स इतका आवडला की त्याने 'रंगीला' चित्रपटासाठी तिची निवड केली. 'रंगीला' सुपरहिट झाल्यानंतर उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.
रामगोपाल वर्माच्या पत्नीने लगावली कानाखाली
रामगोपाल वर्माने एका चित्रपटातून माधुरी दिक्षितला काढून उर्मिलाला घेतल्यानंतर पुन्हा एकदा या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. रामगोपाल वर्मा विवाहित होते. जेव्हा त्याच्या पत्नीला अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिने उर्मिलाच्या कानाखाली लगावली होती. यानंतर रामगोपल वर्माचा घटस्फोट झाला. यासह उर्मिलासोबतचं नातंही संपलं.
उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. तिने लहानपणी श्रीराम लागू यांच्यासोबतही काम केलं आहे. १९९१ मध्ये आलेल्या 'नरसिम्हा' चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१६ मध्ये उर्मिलाने काश्मिरी मॉडेल, उद्योजक मोहसीन अख्तरसोबत याच्यासोबत लग्न करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यासाठी तिने धर्मांतरही केलं. सध्या उर्मिला राजकारणात सक्रीय असून शिवसेना पक्षाची सदस्य आहे.