बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री तिचं 8 वर्षांचं नातं सपवून पतीपासून घटस्फोट घेत आहे. उर्मिलाने पती मोहसिन अख्तर मीर याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत उर्मिला मातोंडकरने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका न्यायालयात उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. असं म्हटलं जातंय की, उर्मिलाचा घटस्फोट हा एकमेकांच्या सहमतीने होत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिला मातोंडकर पूर्ण विचार करुन मोहसिन अख्तर मीरसोबतचं नातं संपवण्याच्या निर्णयावर पोहोचल्याचं देखील म्हटलं जातं आहे. या दोघांनी अगोदरच घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात केला आहे. मात्र अद्याप या कपलच्या घटस्फोटामागचे कारण कळलेले नाही. पण असं सांगण्यात येतंय की, हा घटस्फोट एकमेकांच्या अटींवर होत नाही. 



4 फेब्रुवारी 2016 रोजी उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीरने लग्न केलं होतं. हे लग्न फक्त आंतरधर्मामुळे नाही तर वयामुळे देखील तितकंच चर्चेत होतं. उर्मिला मातोंडकर मोहसिनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. 


कोण आहे मोहसिन? 


मोहसिन हा कश्मीरचा व्यावसायिक असून मॉडल देखील आहे. 21 वर्षांचा असताना मोहसिन कश्मीरहून भारतात आला आहे. त्याच बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न होतं. 2009 मध्ये 'इट्स अ मॅन्स वर्ल्ड' मधून त्याने अभिनय क्षेत्रात डेब्यू केला. त्यानंतर 'लक बाय चान्स', 'मुंबई मस्त कलंदर' आणि 'बीए पास' सारख्या सिनेमांत मोहसिन दिसला. नंतर त्याने अभिनय क्षेत्र सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मोहसिन मनिष मल्होत्राशी जोडला गेला आहे. मोहसिन अख्तर मीर आणि उर्मिला मातोंडकरची ओळख पहिल्यांदा 2014 मध्ये डिझाइनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात झाली होती. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं आणि नंतर अमृसरच्या स्वर्ण मंदिराचा दौरा केला आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.