मुंबई : दिग्दर्शक अभिनव देव यांच्या ब्लॅकमेल या सिनेमातील एक गाणे बेवफा ब्युटी प्रदर्शित झाले. या गाण्यात आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी ९० च्या दशकातील अभिनेत्री उर्मिला मांतोडकरचे नृत्य पाहायला मिळणार आहे.


गाण्याच्या जन्म


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे गाणे गायिका पवनी पांडे हीने गायले आहे. तर अमित त्रिवेदी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून हे गाणे अवतरले आहे.डेली-बेली फेम दिग्दर्शक अभिनय देव या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा ६ एप्रिलला प्रदर्शित होईल. सिनेमाची संपूर्ण कथा या गाण्यातून झळकते. तुम्हीही पहा ब्लॅकमेलचे हे गाणे...



२००८ नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला


२००८ मध्ये आलेल्या हिमेश रेशमियाच्या कर्ज या सिनेमात उर्मिला मांतोडकर शेवटची झळकली होती. यानंतर ती मराठी टेलिव्हीजन शोमध्ये दिसली. पण त्यानंतर ती इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.२०१६ मध्ये उर्मिलाने काश्मिरच्या एका बिजनेसमॅन मोहसिन अख्तर मीरसोबत विवाह केला.