Urmila Nimbalkar आई झाली... दिला गोंडस बाळाला जन्म
उर्मिला निंबाळकरने शेअर केली खास पोस्ट
मुंबई : अभिनेत्री आणि युट्यूब असलेली उर्मिला निंबाळकर एका गोंडस बाळाची आई झाली आहे. उर्मिलाने एका मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच हा आनंद उर्मिलाने शेअर केला आहे. तिच्या हटके पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला आहे. (Urmila Nimbalkar blessed with Baby Boy )शुक्रवारीच उर्मिलाने आपल्या डोहाळ जेवणाचा फोटो शेअर केला आहे.
उर्मिला निंबाळकरने शेअर केली खास पोस्ट
वडिलांवर, भावावर Vaibhav Nimbalkar, दिरावर, सासऱ्यावर आणि सगळ्यांत जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर Sukirt Gumaste अति प्रेम असलं की, रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरो ची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय, अशी सुंदर पोस्ट उर्मिलाने लिहिली आहे. #blessedwithbabyboy #Babyboy #newmomlife असे तीन हॅशटॅग वापरत तिने पोस्ट शेअर केलीय.
3 ऑगस्ट रोजी उर्मिलाने बाळाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी उर्मिलाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 3 ऑगस्ट रोजीच सकाळी सात वाजता उर्मिलाने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने 'कोणत्याही क्षणी..आनंद, परमानंद, गोविंद' अशी पोस्ट लिहून फोटो शेअर केला होता. ही तिच्या बाळाच्या आगमनाची हिंट तर नव्हती ना... अशी चर्चा रंगली आहे. ही सारखीच पोस्ट सुकिर्तने देखील शेअर केली होती.
उर्मिलाने आपले हे नऊ महिने अतिशय आनंदात साजरे केले. तिच्या ब्लॉगवरून हे आपल्याला पाहायला मिळालं. अनेकदा तिला यावरून ट्रोलही करण्यात आलं मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष करत आपला आनंद साजरा केला.