Urvashi Rautela on Sonali Kulkarni's Statement : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतसाठी केलेल्या कोणत्या वक्तव्यामुळे तर कधी सोशल मीडिया पोस्टमुळे. आता उर्वशी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्वशीनं आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonali Kulkarni) भारतीय मुली आळशी आहेत या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीला एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिला हा प्रश्न विचारण्यात आला होता. उर्वशीचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत उर्वशी म्हणाली, हे वक्तव्य मला लागू होऊ शकत नाही, कारण सगळ्यांना माहित आहे की मी इंडस्ट्रीमध्ये आऊटसाइडर आहे. सगळ्यांना माहित आहे की मी किती मेहनती आहे. मी बॉलिवूडमध्ये करिअर केलं आहे. जगभरातील लोक मला ओळखतात. मी दोनवेळा मिस इंडियाचा खिताब जिंकणारी एकमेव भारतीय मुलगी आहे. मिस यूनिवर्स स्पर्धेच्या इतिहासात सगळ्यात कमी वयात परिक्षक होणारी मी पहिली स्त्री आहे. त्यामुळे हे वक्तव्य मला लागू होत नाही. हे वक्तव्य सगळ्या बेरोजगार किंवा काम नसलेल्या मुलींना लागू होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काय म्हणाली होती सोनाली


एका कार्यक्रमात सोनाली म्हणाली होती की आजकाल जास्त मुली या आळशी आहेत. त्यांना असा पती हवा आहे जो त्याच्या आयुष्यात सेटल आहे. पतीला चांगला पगार असला पाहिजे अशी मुलींची इच्छा असते. जेने करून मुलींना काम करण्याची गरज भासणार नाही. खरंतर सोनालीनं केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर सोनालीनं सगळ्यांनी माफी मागितली होती. 


हेही वाचा : 'म्हातारी कोंबडी...', रॅम्पवॉकमुळे Neha Dhupia ट्रोलिंगची शिकार


सोनालीनं मागितली होती माफी


सोनालीनं तिच्या वक्तव्यावर सगळ्यांची माफी मागितली होती. सोशल मीडियावर जेव्हा सोनालीला तिच्या वक्तव्यांमुळे ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती. इतकंच काय तर स्त्री असण्याच्या नात्यानं मला कोणत्याही स्त्रीला दुखावण्याची इच्छा नव्हती. तुम्ही ज्या प्रकारे माझ्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली त्यासाठी मी आभारी आहे. पुढच्यावेळी देखील आपण मोकळेपणानं कोणत्याही वक्तव्यावर बोलण्यास असेच बोलू अशी आशा.