मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी ही गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंतमुळे चर्चेत होती. आता उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनात सामील झाली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आंदोलनात सामील झाल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : Koffee With Karan मध्ये दिलं जाणारं गिफ्ट हॅम्परची किंमत लाखोंमध्ये? पाहून तुम्हालाही बसेल धक्का


उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये उर्वशी केस कापताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत 'हिजाब विरोधी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या 22 वर्षीय महसा अमिनीसाठी आंदोलन करत असलेल्या इराणमधील महिला आणि उत्तराखंड प्रदेशातील 19 वर्षीय अंकिता भंडारीला पाठिंबा दर्शविण्यासाठी मी माझे केस कापत आहे,' असं कॅप्शन उर्वशीनं दिले आहे. 



हेही वाचा : 'आमचं नात कायम...', रतन टाटा यांच्या आयुष्यातील 'तिचं' पहिल्यांदाच जाहिर वक्तव्य


पुढे उर्वशी म्हणाली, 'केस हे महिलांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. सार्वजनिक ठिकाणी केस कापून, स्त्रिया हे दाखवत आहेत की त्यांना समाजाच्या सौंदर्य मानकांची पर्वा नाही आणि ते कसे कपडे घालतात किंवा कसे वागतात हे ठरवू देत नाहीत. जेव्हा स्त्रिया एकत्र येतात आणि एका स्त्रीचा प्रश्न हा संपूर्ण स्त्री जातीचा प्रश्न मानतात. आता स्त्रीवादात नवा उत्साह येईल.' (urvashi rautela chops off her hair know the reason why) 


हेही सविस्तर : 'Hero ला नग्न दाखवू शकत नाही, पण स्त्रीला नग्न दाखवले तर…'; स्मिता पाटील यांचे 'ते' वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत


इराणमध्ये हे प्रकरण 22 सप्टेंबर रोजी सुरु झाला. हे प्रकरण सुरु होण्यामागे महसा अमिनीच्या अटकेपासून झाली. महसानं नीट हिजाब घातला नाही म्हणून तिला मॉरालिटी पोलिसांनी ताब्यात घेतलं. महसा अमिनी पोलीस ठाण्यात बेशुद्ध पडल्या होत्या आणि त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. अमिनीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून तिच्यासोबत कोणतेही गैरवर्तन झालं नाही असं पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर इराणमधील अनेक शहरं, गावं आणि गावांमध्ये निदर्शने सुरू आहेत.'