Urvashi Rautela Cannes Film Festival 2023: कान्स चित्रपट महोत्सवात यावेळी अनेक भारतीय सेलिब्रेटींनी (Bollywood Celebrity) हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्याकडे सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. यावेळी तिनं घातलेल्या नेकलेसची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. उर्वशीला यावेळी हा मगरीचा नेकलेस घातल्यामुळे ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागला आहे. अनेकांनी तिच्या या लुकची खिल्लीही उडवली आहे तर तिच्या फॅन्सनी देखील तिची या नेकलेसची स्तुतीही केली आहे. यावेळी उर्वशीचा संपुर्ण लुक हा प्रचंड चांगला होता. यावेळी तिनं घातलेला पिंक कलरचा ड्रेस आकर्षक वाटत होता. हा ड्रेस फ्लर्सचा होता. (urvashi rautela crocodile necklace price cost for 200 crore latest entertainment trending news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांनी जरी तिच्या या नेकलेसवरून तिची खिल्ली उडवलेली असली तरी मात्र तिच्या या नेकलेसची (Urvashi Rautela Necklace Price) किंमत ऐकून तुम्ही जागेवरून उडालाच. रिपोर्ट्सनुसार या नेकलेसची किंमत ही 200 कोटी रूपयांच्या आसपास आहे. हा नेकलेस लक्झरी ब्रॅण्ड कार्टीयरनं तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असेही कळते आहे की या कंपनीनं हा नेकलेस तयार करण्यासाठी चक्क 20 मिलियन यूरो म्हणजेच 179 कोटी रूपये खर्च केले आहेत. हे त्यांचे कलेक्शन 2018 साली आऊट झाले होते. हा नेकलेस तयार करण्यासाठी साधारणपणे कट फॅन्सी येलो डायमंड वापरण्यात आला असून यात 18 कॅरेट येलो गोल्डही वापरण्यात आले आहे. 


ह नेकलेस याआधी मॅक्सिकन एक्ट्रेस मारा फेलिक्स नं घातला होता. 1980 साली त्यांनी हा नेकलेस घातला होता. या नेकसेलचे वैशिष्ट्य म्हणजे यात 60.02 कॅरेटचा वापर झाला आहे. त्यातून फॉर्ब्सनुसार, दुसऱ्या मगरीत 18 कॅरेट व्हाईट गोल्डचा वापर झाला आहे. त्यावर 66.86 कॅरेट वजनाचे पाचू लावण्यात आले आहेत. 


हेही वाचा - Cannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कायम चर्चेत उर्वशी


उर्वशीनं याआधी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून हजेरी लावली होती. उर्वशीच्या लुकची यावेळी प्रचंड प्रमाणात चर्चा झाली होती. उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्या लिंकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मध्यंतरी ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर उर्वशीनं आपल्या शुभेच्छाही ऋषभ पंतला दिला होता. त्यावेळी तिच्या या पोस्टचीही प्रचंड (Rishabh Pant and Urvashi Rautela) प्रमाणात चर्चा झाली होती. ऋषभ ज्या रूग्णालयात होता त्या रूग्णालयाचा फोटो शेअर करत उर्वशीनं हे पोस्ट टाकली होती. त्याचीही बरीच चर्चा झाली होती. यापुर्वीही उर्वशीनं कान्स महोत्सवाला हजेरी लावली होती. उर्वशी ही मिस युनिव्हर्सची विजेती आहे.