मुंबई : 'कच्चा बदाम' बदाम या गाण्याने तरुणाईलाच नाही तर सेलिब्रिटींनाही वेड लावलं आहे. शेंगदाणे विकणाऱ्याचे लिरिक्स एवढे प्रसिद्ध होतील आणि तो रातोरात स्टार बनेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र या गाण्यावर ठेका धरण्याचं मन प्रत्येकाचं होत आहे. मग त्यामध्ये सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कच्चा बदाम' ह्या गाण्यावर आता उर्वशी रौतेलालाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. तिने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. तिलाही या गाण्यावर रिल शेअर करण्याचा मोह आवरला नाही. तिने या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे. 


उर्वशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्वशी या व्हिडीओमध्ये खूप सुंदर दिसत आहे. शेवटच्या काही सेकंदात तिने जबरदस्त ठुमके लगावले आहेत. तिच्या या व्हिडीओला युजर्सनी चांगली पसंती दिली आहे. 


उर्वशीच्या व्हिडीओवर अनेक फॅन्स फिदा झाले आहेत. आपल्या हटके स्टाईलमुळे उर्वशी नेहमी चर्चेत असते. मात्र आज ती कच्चा बदाम डान्समुळे खूप चर्चेत आहे. तिने पहिल्यांदाच कच्चा बदाम या ट्रेन्डिंग असलेल्या गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं आहे.