Rishabh Pant,Urvashi Rautela: बॉलिवूड स्टार अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा खेळाडू रिषभ पंत (rishabh pant) यांचं नाव एकमेकांशी नेहमी जोडलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media Video) या दोन नावांची नेहमी चर्चा असते. काही दिवसांपूर्वी शुभमन गिलने (Shubman Gill) या दोघांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela Instagram) तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून नवा व्हिडीओ शेअर केलाय. त्यावरून आता नव्या चर्चेला उधाण आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीने एक व्हिडीओ सध्या तिच्या अधिकृत अकाऊंटवरून (Urvashi Rautela Instagram Video) शेअर केलाय. त्यामध्ये उर्वशी हातात दोन दारूच्या बॉटल घेऊन उभी असल्याचं दिसतंय. हॉट लाल हिरव्या साडीमध्ये उर्वशी वेगवेगळी हावभाव देताना दिसते. त्यामुळे उर्वशीला नेमकं काय झालंय? रिषभ पंतच्या आठवणीत उर्वशी बेहाल झाली की काय? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.


आणखी वाचा - Rishabh Pant: रिषभ आणि उर्वशीचं नातं काय? शुभमन गिलने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...


उर्वशीला झालंय काय?


उर्वशी रौतेलाने बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे केलेत पण त्यात तिला फारसं यश मिळाले नाही. आता तिने भोजपुरी इंडस्ट्रीत पदार्पण केल्याचं दिसतंय. तिचा 'एक डायमंड का हार लैदा यार हमरे राजाजी' हे भोजपुरी गाणं (Urvashi Rautela Bhojpuri Song) रिलीज झालंय. हे गाणे मीट ब्रदर्सच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलंय. त्या गाण्यात देखील उर्वशी (Urvashi Rautela Hot Look) हॉट लाल हिरव्या साडीमध्ये दिसते. त्यामुळे उर्वशीने शेअर केलेला व्हिडीओ गाण्याचं प्रमोशनसाठी होता, हे स्पष्ट होतंय. 


पाहा Video -



दरम्यान, WHO’S MY BOSS? असं कॅप्शन दिल्याने तिचा व्हिडीओ अनेकांनी शेअर केलाय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा उर्वशीला रिषभच्या नावावरून डिवचण्याची संधी सोडलेली नाही. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) आठवणीत उर्वशीने हे काय हाल करून घेतलेत, असं एका युझरने म्हटलंय. मात्र, दुसरीकडे उर्वशीच्या डान्स व्हिडीओने युट्यूबर (Waltair Veerayya Boss Party) धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळतंय.