उर्वशी रौतेलाच्या गळ्यावर Love Bite, सगळीकडे जोरदार चर्चा
Urvashi Rautela च्या गळ्यावर निशाण, व्हॅलेंटाईन डे च्या दोन दिवस आधी मार्क्समुळे चर्चांना उधाण
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. तिचा हॉट अंदाज आणि तिचा बोल्डनेस हा चाहत्यांना खूप आवडत असतो. पण आता चर्चा आहे ती तिच्या Love Bite ची. मुंबई एअरपोर्टवर दिसलेल्या उर्वशीच्या गळ्यावर या निशाणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. जेव्हा अभिनेत्री बाहेर दिसते तेव्हा पापाराझी तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात. तिच्या फोटो आणि व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतात.
यावेळीही असेच काहीसे घडले, पण ती येथे प्रसिद्धीझोतात येण्याचे कारण म्हणजे तिचा आउटफिट किंवा तिचा बोल्डनेस नाही. उलट तिच्या गळ्यात 'लव्ह बाईट' (Love Bite) असं काहीतरी दिसतं. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटते. यासोबतच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
गळ्यावर एक निशाण, ज्याने खेचलं सगळ्यांच लक्ष
उर्वशी रौतेलाचा हा लेटेस्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये उर्वशी ग्लिटर टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये एअरपोर्ट लुकमध्ये दिसत आहे. लाल आणि काळ्या कॉम्बिनेशनमध्ये तिचा लूक किलर दिसत आहे. यासोबत तिने पोनी टेल स्टाईल केले आहे आणि गॉगल घातला आहे.
तिचा लूक अप्रतिम दिसत आहे. यादरम्यान, अभिनेत्रीला पाहताच पापाराझी तिला घेरतात आणि तिचे फोटो काढू लागतात. पण याच दरम्यान उर्वशीने मान वळवली तेव्हा तिच्यावर दिसणारी खूण पाहून सर्वांचेच होश उडून गेले. लोकांची अशी प्रतिक्रिया होती कारण तिच्या मानेवर 'लव्ह बाइट' स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर लोकांनी अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करायला सुरुवात केली आहे.