Urvashi Rautela Rishabh Pant Relationship: (Indian Cricket team) भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) 2022 या वर्षाच्या अगदी शेवटीच भीषण अपघात झाला. (car accident) कार अपघातानंतरची दृश्य पाहिल्यानंतर पंतवरचं मोठं संकट टळलं असंच म्हणत अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या खेळाडूच्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या. पंतची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री (Urvashi Rautela ) उर्वशी रौतेलासुद्धा इथं मागे राहिली नाही. (Urvashi Rautela mother Meera prays for speedy recovery of indian cricketer Rishabh Pant)


हेसुद्धा वाचा : Rishabh Pant Car Accident: मला वाचवा, मी ऋषभ पंत आहे...; अपघातानंतर रक्तबंबाळ खेळाडूचा बस ड्रायव्हरने वाचवला जीव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


उर्वशीनं नाव न घेताच एक सूचक पोस्ट करत पंत आणि त्याच्या कुटुंबीयांना आधार देणारी एक पोस्ट केली होती. त्यामागोमागच आता तिची आई, मीरा रौतेलासुद्धा यासुद्धा पंतसाठी प्रार्थना करणाऱ्यांच्या यादीत आल्या आहेत. इकतंकच काय, तर त्यांनी म्हणे कोणा बाबांच्या नावाचाही धावा केला आहे. सोशल मीडियावर मीरा यांची ही पोस्ट पाहून काहींनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. पण, ट्रोलर्सनी मात्र 'लेक शेर, तर आई सव्वाशेर' अशा प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली, तर काहींनी उपरोधिक टिकांची झोड उठवली. 


उर्वशीच्या आईनं पोस्टमध्ये असं काय लिहिलंय?  


ऋषभ पंतचा फोटो शेअर करत उर्वशीच्या आईनं लिहिलंय, 'सोशल मीडियावर उठणाऱ्या अफवा एका बाजूला आणि तुम्ही या दुखापतीतून सावरत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचं नाव उज्वल करणं दुसऱ्या बाजुला'. इतक्यावरच न थांबता, सिद्धबलिबाबा यांची तुमच्यावर खास कृपा राहो असं म्हणत त्यांनी फॉलोअर्सनाही पंतसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं. 



मीरा रौतेला यांची ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वांच्या Feed मध्ये दिसताच काहींनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 'आता काय, आईच लेकिच्या नात्यासाठी मैदानात आलिये...', 'सासुबाईंच्या सदिच्छा कायमच फळतात', 'अहो तुमचा जावई बरा होईल... काळजी करु नका' अशा एक ना अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांचीच फिरकी घेतली. 


उर्वशीसोबतही असंच घडलेलं.... 


ऋषभ पंतच्या अपघातानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलानंसुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यानंतर अनेकांनीच तिचीही खिल्ली उडवली होती. एका पांढऱ्या आऊटफिटमधील फोटो शेअर करत तिनं Praying असं कॅप्शन लिहिलं होतं. त्यावरून अगं, तो जखमी आहे फक्त... असं म्हणत Social Media Users कडून तिला निशाण्यावर घेण्यात आलं होतं.