Urvashi Rautela New Blue Bodyfit Dress: कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela News) चार चांद लावून दिले होते. त्यातून तिच्या मगरीच्या नेकलेसनं तर तिला ट्रोलही करण्यात आले होते. परंतु त्यावरही तिनं नेटकऱ्यांनी सपाटून उत्तर दिलं आहे. आता कान्स महोत्सवाची सांगता झाली आहे. परंतु उर्वशीचा कान्स चित्रपट महोत्सवातील जलवा हा काही केल्या कमी होत नाहीये. आता उर्वशीनं एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यातील तिचं सौंदर्य पाहून नेटकरी पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या नव्या आऊटफिट सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. त्यामुळे उर्वशी (Urvashi Rautela New Outfit) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीनं यावेळी कान्समध्ये फारसच सटल परंतु उठावदार रंगांचे आऊटफिट्स परिधान केले होते तिच्या या आऊटफिट्सचीच सर्वत्र चर्चा होती. 


कधी निळा, कधी हिरवा, कधी गुलाबी नाहीतर केशरी अशा विविध रंगांच्या गाऊन्समध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री करत उर्वशीनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. त्यातून तिच्या मगरीच्या नेकलेसनं तर एकच कहर माजवून दिला होता. उर्वशी आपल्या म्युझिक व्हिडीओजमध्येही व्यस्त आहे परंतु यावेळी तिनं कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. आता तिनं एक नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामध्ये तिनं सॅटिन सिल्कचा टाईट बॉडीफीट ड्रेस परिधान केला आहे. तिनं कान्सच्या बिटिएसचा हा (Urvashi Rautela New Video) व्हिडीओ आपल्या इन्टाग्राम अकांऊटवकरून शेअर केला आहे. ज्यात ती प्रचंड आकर्षक आणि सुंदर दिसते आहे. तिचा हा लुक पाहून चाहत्यांनी तूफान कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 


यावेळी तिनं या नव्या व्हिडीओमध्ये नेव्ही आणि स्काय ब्लू कलरचा सिल्क (Uravashi Rautela Bodyfit Dress) आणि सॅटिनचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या खांद्यावर मण्याचे लेस आहेत. तर हातात तिनं केप घातला आहे. हा ड्रेस फ्लॉन्ट करत आणि हातात केप घेत तिनं यावेळी ग्लॅम वॉक केला आहे. सध्या तिच्या या वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या या व्हिडीओखाली चाहत्यांच्या तूफान कमेंट्स आल्या आहेत. त्याही इतक्या की उर्वशीच्या सौंदर्यांचे कौतुक थांबता थांबत नाहीये. 


हेही वाचा - मराठमोळी अभिनेत्री Mrunal Dusanis च्या लेकीचे फोटो पाहिलेत का? तिच्याइतकीच दिसते सुंदर...Photo व्हायरल


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तर काहींनी तिला पुन्हा ट्रोल केलं आहे. एका युझरनं म्हणलंय की, ''किती मेकअप लावला आहे. त्या मेकअपचा भार जाणवत असेल नाही का?'' तर दुसऱ्या एका युझरनं तिचं सौंदर्य पाहून म्हटलंंय की, ''रिषम पंतचं नुकसान''. सध्या तिच्या या नव्या लुकनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.