मराठमोळी अभिनेत्री Mrunal Dusanis च्या लेकीचे फोटो पाहिलेत का? तिच्याइतकीच दिसते सुंदर...Photo व्हायरल

Mrunal Dusanis Daughter Latest Photos: अभिनेत्री मृणाल दुसानिस ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. अभिनयापासून दूर असलेली ही अभिनेत्री (Mrunal Dusanis) सध्या आपल्या मुलीचेही फोटो शेअर करताना दिसते आहे. तिनं एक नुकताच तिच्या मुलीचा एक व्हिडीओ शेअर (Video) केला आहे. ज्यात ती प्रचंड क्यूट दिसते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 23, 2023, 02:00 PM IST
मराठमोळी अभिनेत्री Mrunal Dusanis च्या लेकीचे फोटो पाहिलेत का? तिच्याइतकीच दिसते सुंदर...Photo व्हायरल title=
(Photo : Mrunal Dusanis | Instagram)

Mrunal Dusanis Daughter Latest Photos: मराठी मालिकांचा चाहतावर्ग हा अफाट आहे. प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या मालिका या आजही आवडीनं पाहतात. जगभरातील मराठी प्रेक्षक हा मराठी मालिकांशी जोडला गेला आहे. त्यामुळे या मालिकांची वेगळीच क्रेझ आहे. काही वर्षांपुर्वी अशीच एक मालिका 'झी मराठी'वर झळरली होती आणि ती (Mrunal Dusanis Daughter Nurvi Latest Video) म्हणजे 'माझिया प्रियाला प्रित कळेना' ही. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील अभिनेत्री मृणाल दुसानिस ही अभिनयापासून दूर असली तरी तिचे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

त्याचसोबत तिचे इन्टाग्रामवरही खूप फॉलोवर्स आहेत आणि ती आपल्या चाहत्यांना कायमच अपडेट ठेवत राहते. सध्या मृणालची एक लेटेस्ट पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. तिनं आपल्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिच्या मुलीकडे पाहून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 'तुमची मुलगी इतकी मोठी झाली?' अशा प्रतिक्रिया येताना दिसत (Mrunal Dusanis Daughter Age) आहेत. मध्यंतरी काही लोकप्रिय मालिकांतून काम केल्यानंतर मृणाल दुसानिसनं अभिनयापासून ब्रेक घेतला आहे आणि तिनं आपल्या घर संसाराकडे लक्ष द्यायचे ठरविले आहे. सध्या ती आपलं फॅमिली लाईफ एन्जॉय करताना दिसते आहे. 2016 साली तिनं नीरज मोरे ह्याच्याशी विवाहगाठ बांधली. 

हेही वाचा - TMKOC: ''आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात...'' 'तारक मेहता'च्या टप्पूची 'ती' पोस्ट चर्चेत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर ती अनेक लोकप्रिय मालिकांतून दिसली होती. तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते. परंतु त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली आणि गेल्याच वर्षी 24 मार्चला तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिच्या लेकीचे नावं नूर्वी असे आहे. नूर्वी आता थोडी मोठी झाली असून तिचे फोटो हे चर्चेत आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेत (Mrunal Dusanis photos) वास्तव्यास असलेली मृणाल आपल्या लेकीचे फोटो हे वेळोवेळी पोस्ट करताना दिसते. तिच्या या फोटोला आणि व्हिडीओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळताना दिसतो. सध्या तिनं नूर्वीचा एक क्यूट व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तूफान लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या या व्हिडीओ खाली नूर्वीचा क्यूटनेस पाहून 'खूप छान', 'अतिशय गोड', 'क्यूट', 'नेहमीप्रमाणेच सुंदर', अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. नूर्वी ही एक वर्षांची झाली आहे. फोटोमध्ये ती मस्त आनंदी आणि स्वछंदी दिसते आहे. या व्हिडीओमध्ये ती एका खेळण्यातल्या (Mrunal Dusanis News) गाडीत बसून तिचा खेळ एन्जॉय करते आहे. मृणाल दुसानिसचा नवरा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे त्यासाठी तो कामानिमित्त अमेरिकेत असतो. तेव्हा मृणालही अमेरिकेत स्थायिक झाली आहे.