Urvashi Rautela on Virat Kohli room video:  टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीबाबत धक्कादायक घटना घडली. विराट कोहली (Virat Kohli Leaked Video) ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या हॉटेलमधील रूममधला एक खाजगी व्हिडिओ आज पहाटे लीक झाला होता. या व्हिडिओ लीक झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर आता हॉटेल व्यवस्थापनाने कठोर भूमिका घेत त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) संताप व्यक्त केलाय. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (Anushka Sharma Instagram) व्हिडिओ शेअर करत अतिशय घृणास्पद आणि मानवतेचे उल्लंघन असल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील संताप अनावर झाल्य़ाचं पहायला मिळालं आहे.


आणखी वाचा - Urvashi Rautela: डान्स करताना उर्वशी रौतेला विसरली भान...कॅमेऱ्यासमोर ओलांडल्या मर्यादा


उर्वशीने (Urvashi Rautela) विराटच्या पोस्टवर कमेंट केली आणि इन्स्टावर स्टोरीवर शेअर देखील केली. उर्वशी म्हणाली, 'नक्कीच, हे खूप वाईट आणि निर्लज्ज आहे. कल्पना करा की तो एखाद्या मुलीच्या खोलीत असंच काम करेल का?, असा परखड सवाल उर्वशीने स्टोरी शेअर (Urvashi Rautela Instagram) करत उपस्थित केलाय.


पाहा स्टोरी -



दरम्यान, असं अव्यावसायिक वर्तन सहन केलं जाऊ शकत नाही. हे निंदनीय आहे, असं उर्वशीचं मत आहे. उर्वशीची ही इंस्टाग्राम स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसते. विराटच्या (Virat Kohli Leaked Video) रुममधला व्हिडिओ लीक झाल्यानंतर पर्थच्या हॉटेल व्यवस्थापनाने एक निवेदन जारी केलं. या निवदेनात त्यांनी विराटची बिनशर्त माफी मागितली आहे.