मुंबई : आपल्या सौदर्यांने सर्वांना मोहात पाडणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्वशी नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटोज शेअर करत असते. ज्यावर लोकं कमेंट्स आणि लाईक्सचा त्या पोस्टवर पाऊस पाडतात. सध्या उर्वशीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. परं तु हा तिने स्वत: शेअर केलेला  व्हिडिओ नाही, तर तो तिच्या फॅन्सने एका फॅन पेजवर शेअर केला आहे. यामध्ये उर्वशी तिच्या ड्रेसमुळे uncomfortable झालेली दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीने या व्हिडिओत हिरव्या रंगाचा टाईट स्किनी ड्रेस घातला आहे. हा व्हिडिओ तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेता अरशद वार्सी सुद्धा बसलेला आहे. दरम्यान, उर्वशीने जो बॉडी फिटेड ड्रेस घातलाय यात ती प्रचंड uncomfortable झाली आहे.


या ड्रेसमध्ये तिला उठताना किंवा बसताना त्रास होत आहे कारण तो खूप छोटा ड्रेस देखील आहे. परंतु अखेर तिचा 'Oops Moment' कॅमेरात कैद झालाच. खरेतर तिने हे होऊ नये याची काळजी घेत होती. परंतु ती जेव्हा तिचा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवत होती तेव्हाच ती या 'Oops Moment'चा शिकार झाली.



तसं बघायले गेले तर, उर्वशीसोबत हे काही पहिल्यांदाच घडत नाही. याआधी पण बऱ्याचदा तिचे अशाप्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावरुन उर्वशी रौतेला एक अभिनेत्री तर आहेच पण एक कॉन्फिडेंट मॉडेलही असल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे तिला असे 'Oops Moment' चांगल्याप्रकारे हाताळता येतात असेच म्हणता येईल.


काहीदिवसांपूर्वी तिने आपला मड बाथवाला एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तिचा मातीने माखलेला बोल्ड हॉट अंदाज पाहून चाहाते घायाळ झाले आहेत. यामध्ये तसा तो फोटो उर्वशीचाच आहे हे ओळखता येत नाबी परंतु तो उर्वशीच्या अकांउंटवरुन शेअर झाल्यामुळे आणि तिच्या कमेंट्समुळे तिच्या चाहात्यांना कळला.


हा मड बाथ घेताना तिने कपडे तरी घातले होते का? की नाही हे देखील चाहात्यांना कळत नाही आहे, त्यामुळे ती या कारणामुळे देखील लोकांकडून ट्रोल होत आहे. यामध्ये तिला एका ट्रोलर्सने तर  'नायक' चित्रपटातील अनिल कपूर असं म्हटलं आहे.



परंतु या बाथबद्दल सांगताना उर्वशी म्हणाली की, ही मड थेरपी आहे, जी 20 हजार रुपयांची आहे. त्याच बरोबर उर्वशीने ही थेरपी तिच्या सैंदर्याचे आणि सुंदर शरीराचे रहस्य आहे.


काहीदिवसांपूर्वी उर्वशी अरबचे सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत 'वर्साचे बेबी' या चित्रपटात झळकली होती. आता जिया स्टूडिओजची आगामी वेब सीरीज 'इंस्पेक्टर अविनाश'मध्ये ती अभिनेता रणदीप हुड्डासोबत झळकणार आहे.