उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला Viral; लोकं म्हणतात, `पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...`
Urvashi Rautela Private Video: उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी ती दुसऱ्या कोणत्या कारणामुळे चर्चेत नाही तर बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय.
Urvashi Rautela Private Video: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात. कधी ते कोणाशी भांडतात, हुज्जत घालतात तर कधी कोणत्या तरी रिअॅलिटी शोमध्ये जाऊन वेगळ काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वागण्या बोलण्यावरुनच यांचा आगामी सिनेमा येतोय, असा अंदाज लावता येतो.उर्वशी रौतेलाच्या बाबतीत हे खरं ठरतं.एरवी ती टीम इंडियाचा खेळाडू रिषभ पंत यांच्यासोबत सोशल मीडियात हुज्जत घालताना दिसते. यावरुन रिषभ पंतचे फॅन्स तिला नेहमी ट्रोल करतात. पण उर्वशीदेखील काही ऐकत नाही. तिचे रिषभसाठी टोमणे देऊन चर्चेत राहणे तितक्यच ताकदीने सुरु असते. आता रिषभच्या फॅन्सना उर्वशीला ट्रोल करण्यासाठी आणखी एक कारण सापडलंय. कारण उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेंडींगला आलाय.
सनी देओल स्टारर सिनेमा 'सिंह साहब द ग्रेट' मधून हिंदी सिनेमात पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियात खूप चर्चेत असते. पण आता तिचा खासगी व्हिडीओ समोर आल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये ती बाथरुममध्ये दिसतेय. या व्हिडीओमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. असे असले तरी ती सर्वकाही प्रसिद्धीसाठी करते, असे म्हणत तिला ट्रोल करत आहेत.
उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी ती दुसऱ्या कोणत्या कारणामुळे चर्चेत नाही तर बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय.
व्हिडीओ
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेला कपडे बदलताना दिसतेय. पण हा व्हिडीओ म्हणजे एक पीआर स्टंट असल्याचे तुमच्या सहज लक्षात येऊ शकते. उर्वशी रौतेलाच्या या व्हिडीओवर लोक विचित्र प्रतिक्रिया देत आहे. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी ती काहीही करु शकते, असे एका युजरने म्हटलंय. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याची कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे.
कोणच्या सिनेमाचा सीन?
उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ खरा नाहीय. तिचा एक जहागिर नॅशनल यूनिव्हर्सिटी (जेएनयू) नावाचा सिनेमा आलाय. लोक कमेंट्समध्ये हा सीन त्यातलाच असल्याचे सांगतायत. पब्लिसिटी स्टंट करण्याची उर्वशीची ही काय पहिलीच वेळ नाहीय, असे लोक म्हणतात.अशा अनेक पद्धती तिने याआधी अवलंबल्या असल्याचे सोशल मीडियात यूजर्स म्हणतायत.