हार्दिक पांड्याच्या साखरपुड्यावर एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया
सगळीकडेच या पोस्टची चर्चा
मुंबई : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने 2020 या नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच सर्बिआय मॉडेल नताशा स्टेनकोविकसोबत साखरपुडा केला. याची माहिती स्वतः हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली. पोस्टसमोर येताच सगळ्यांकडून यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यामध्ये हार्दिक पांड्याची Ex Girlfriend ची प्रतिक्रिया देखील आली आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही हार्दिक पांड्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. उर्वशीने हार्दिक आणि नताशाला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने दोघांचे फोटो आपल्या स्टोरीत पोस्ट केली आहे. या स्टोरीत उर्वशीने लिहिलं आहे की,'हार्दिक पांड्या, साखरपुड्याच्या शुभेच्छा. तुझं हे नातं कायम आनंदी आणि भरपूर प्रेमाने भरलेलं असू दे. मी तुम्हाला शुभेच्छा देते. जर तुम्हाला कशाची गरज लागल्यास मी आहे.'
उर्वशीची ही स्टोरी सगळ्यानाच धक्का देणारी होती. कारण या अगोदर उर्वशी आणि हार्दिक एकमेकांना डेट करत होते. अनेकदा सोशल मीडियावर यांना एकत्र पाहिण्यात आलंय. एवढंच नव्हे तर एकमेकांच्या पोस्टना कमेंट करताना देखील हे दिसले. एवढंच नव्हे तर तिच्या सिनेमाच्या रिलीजनंतर हार्दिकने उर्वशीला कुत्रा गिफ्ट देखील केला होता. मात्र याबाबत दोघांनी कोणतीच अधिकृत माहिती दिली नव्हती.
बुधवारी 1 जानेवारी 2020 रोजी हार्दिकने आपल्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांनी दिली. 'मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान, 01.01.2020 #engaged' अशी पोस्ट हार्दिकने शेअर केली होती.
नताशाला सगळ्यात पहिलं प्रकाश झा यांच्या 'आयटम नंबर'मध्ये पाहण्यात आलं. त्यानंतर नताशा डीजेवाले बाबू या गाण्यात देखील दिसली. यानंतर 'बिग बॉस 8' मध्ये नताशा सहभागी झाली होती. आता नताशा 'नच बलिये' या टीव्ही शोमध्ये दिसली होती.