Urvashi Rautela at Cannes: कान्स चित्रपट महोत्सवाची सांगता झाली असली तरी देखील या फेस्टिवलबद्दल अजूनही चर्चा रंगताना दिसत आहेत. सध्या या फेस्टिवलची (Urvashi Rautela News) चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सेलिब्रेटींच्या कपड्यांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधले होते ते म्हणजे उर्वशी रौतेला हिनं. तिच्या मगरीच्या डिझाईनच्या लुकनं चर्चाला उधाण आले होते. सध्या तिच्या या लुकचेही सर्वत्र कौतुक केले जात असेल तरी काहींनी मात्र तिला सपाटून ट्रोल केले आहे. यावेळी तिनं ट्रोलर्सना (Urvashi Rautela Trolled) उत्तरही दिले आहे. तिनं ट्रोलर्सच्या कमेंट्स वाचून डोक्याला हातच मारून घेतला आहे. नक्की काय म्हणाली उर्वशी हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. (urvashi rautela reacts to trolled after trolling her on wearing crocodile designed expensive necklace)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कान्स चित्रपट महोत्सवात यावेळी भारतीय सेलिब्रेटींचीही मोठी जंग पाहायला मिळाली होती. त्यातून भारतीय युट्युबर्सनाही यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात येण्याची मोठी संधी मिळाली होती. त्यामुळे यावेळेसचा कान्स महोत्सव हा फार वेगळा ठरला. सेलिब्रेटींसोबतच युट्युबर्सनाही यावेळी मोठ मंच मिळाला होता. अनेकांना यावेळी ट्रोलही करण्यात आले होते. त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलवरून अनेकांनी मीम्सही तयार केले होते त्यामुळे सोशल मीडियावर असे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होयला फार वेळही लागला नाही. त्यातून उर्वशीच्या गळ्यातलं तर कहरच केला होता. तिनं गळ्यात असं काही घातलं होतं की नेटकऱ्यांच्या नजरा तिच्याकडेच खिळल्या होत्या. 


हेही वाचा - 'इथून थेट शेतात जातेय...' बिग बींच्या नातीला ट्रॅक्टर चालवताना पाहून नेटकऱ्यांना आठवली आर्ची


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मगरीच्या डिझाईनचा नेकलेस घातल्यानं तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तिच्यावर मीम्सही तयार झाले. आता यावर तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ब्रुट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिनं ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. यावेळी ती म्हणते की, ''ज्या लोकांना मी घातलेल्या या नेकलेसबद्दल योग्य माहिती नाही तीच लोकं या नेकलेसवरून विक्षिप्त कमेंट्स करत आहेत. परंतु ज्या लोकांना या नेकलेसबद्दल योग्य माहिती आहे, ज्यांना याचा इतिहास माहिती आहे की या नेकलेसला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांना हा क्रोकोडाईल नेकलेस नक्कीच आवडेल. याबद्दल तुम्हीही माहिती वाचायला हवी. याबाबत मलाही काहीच माहिती नव्हती. परंतु मोनिका बेलुचीनेही ते कान्समध्ये परिधान केल्याचे मला कळले. पण मला याबाबत काहीच माहिती नव्हती.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिच्या या नेकलेसची किंमत ही 200 कोटी रूपये होती. हा नेकलेस लेक्झरीयस (Urvashi Rautela Necklace Price) ब्रॅण्ड कार्टियरनं तयार केला आहे. या नेकलेसवर या कंपनीनं 20 दशलक्ष युरो म्हणजेच 179 रूपये खर्च केले होते.