ऋषभ पंतचं Latest Location शोधत होती उर्वशी? मोबाईल चोरामुळं अभिनेत्रीची गुपितं समोर
Urvashi Rautela Search History Leaked : उर्वशी रौतेलानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा 24 कॅरेट गोल्डचा iPhone हरलव्याचे सांगितले होते. त्यात आता सोशल मीडियावर चोराकडून तिची सर्च हिस्ट्री लीक झाली आहे.
Urvashi Rautela Search History Leaked : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच चर्चेत असते. आता उर्वशी रौतेला चर्चेत असण्याचं कारण तिचा फोन आहे. उर्वशी अहमदाबादमध्ये भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेली होती. मात्र, यावेळी उर्वशीला खूप मोठा धक्का बसला त्याचं कारण म्हणजे 24 कॅरेट गोल्डचा iPhone चोरी झाला होता. त्यानंतर उर्वशीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मॅच पाहायला गेलेल्या लोकांची मदत मागितली आहे. उर्वशीनं यावेळी सांगितलं की तिचा हा फोन 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा आहे. तर उर्वशीची सर्च हिस्ट्री लीक झाल्याचं म्हटलं जात आहे.
उर्वशीनं तिच्या एक्स अकाऊंट म्हणजे आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत उर्वशी म्हणाली होती की माझा 24 कॅरेटचा खऱ्या सोन्याचा आयफोन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हरवला आहे. जर कोणाला मिळाला असेल तर प्लीज मदत करा. माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधा. जे मला मदत करू शकत असतील त्यांना टॅग करा. उर्वशीच्या या ट्वीटवर जिथे तिच्या काही चाहत्यांनी वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे तर दुसरीकडे त्यावर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
उर्वशीची सर्च हिस्ट्री लीक?
हेही वाचा : 'मोदी जी, आता आम्ही कुठे जायचं?' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढवलं अक्षय कुमारचं टेन्शन
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'चोरानं तुझी सर्च हिस्ट्री लीक केली आहे.' तर त्या व्यक्तीनं एक स्क्रिनशॉर्ट टाकला त्यात सर्च हिस्ट्री दिसत आहे. सगळ्यात आधी 'नसीम शाह फोन नंबर', दुसरं सर्च आहे 'ऋषभ पंत करंटलोकेशन', तिसरं सर्च होतं की 'घरच्या घरी आयआयटी डिग्री कशी बनवायची. चौथ सर्च आहे मॅचचे फ्री तिकिट कसे मिळवावे.' पाचवं आहे' 24 कॅरेटचं स्पेलिंग काय?' हे सगळं नेटकऱ्यानं उर्वशीला ट्रोल करण्यासाठी केलं आहे. यात किती सत्य आहे हे कोणाला ठावूक नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही ताई अटेन्शन मिळण्यासाठी काहीही लिहिते.' तिसरा नेटकरी म्हणाला 'आज सकाळीच स्टेडियममधून कचरा काढत असताना मला भेटला. मला मेसेज कर.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'नसीम शाह तर आलाच नाही मग तुझं लक्ष कुठे होतं.'