सौंदर्य खुलविण्यासाठी बॉलिवूडमधील `उर्वशी`ने ही केली वेदनादायक ट्रीटमेंट
उर्वशी रौतेला हिने आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वेदनादायक उपचारपद्धती आपल्या शरिरावर करुन घेतली. याचे राज तिनेच उघड केलेय.
मुंबई : बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्याबाबत जागृत असतात. काहींनी आपले सौंदर्यखुलविण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. आता तर उर्वशी रौतेला हिने आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वेदनादायक उपचारपद्धती आपल्या शरिरावर करुन घेतली. याचे राज तिनेच उघड केलेय.
उर्वशीने या उपचार पद्धतीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेय. कपिंग थेरेपी केल्याचे हे फोटो आहेत. कपिंग थेरेपी ही चायनिज आहे. ही ट्रीटमेंट केल्यानंतर शरिरातील अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात, असे सांगितले जाते. मात्र, ही उपचार पद्धती अधिक वेदनादायक असते.
या उपचारपद्धतीमुळे सौंदर्य वाढते असे सांगितले जाते. त्यामुळे उर्वशी रौतेला हिने ही ट्रीटमेंट केल्याचे बोलले जात आहे.