मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सध्याचा काळ सेलिब्रिटी किड्सचा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी सेलिब्रिटींची मुलं त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चर्चेत होती. पण आता सेलिब्रिटी किड्स त्यांच्या सहलीमुळे चर्चेत आली आहे. सेलिब्रिटी किड्सची सहल नक्की कशी असेल? असा प्रश्न एकदा तरी ट्रॅव्हल प्रेमींना पडला असेल. तर अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan  )सहलीचे (trip) फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील कळेल कशी असते सेलिब्रिटी किड्सची सहल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा सध्या अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. साराने तिच्या सहलीचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अमेरिकेत सारा तिच्या दोन मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. (Sara Ali Khan’s US trip with friends)



साराने तिच्या सोशल मीडियावर (Sara Ali Khan social media) तिच्या सहलीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा आहे. साराच्या फोटोंमध्ये अनेक पदार्थ, तिच्या बॅग्स दिसत आहेत. महत्त्वाचं साराने तिच्या डाएटला रामरम करत चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.


सध्या साराच्या अमेरिका सहलीचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  रविवारी सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती जॉर्जियाच्या अटलांटा येथे तिच्या सामानासह उभी होती. (US trip of  Sara Ali Khan with her friends photo and video viral on social media)


यावेळी साराच्या एअरपोर्ट लूकची देखील चर्चा रंगली. हिरवी ट्रॅकपॅंट आणि प्रिंटेड श्रगसह मॅचिंग क्रॉप टॉप साराने घातला होता. तिच्या एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हातात गुलाबी ट्रॅव्हल उशी आणि काही खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसली. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.