मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती (Naional Award Winner) अभिनेत्री उषा जाधव (Usha Jadhav) हिने 'माई घाट: क्राईम नं103/2005” (Mai Ghat)  या सिनेमासाठी एनवायसी दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिवल(न्यूयॉर्क)(New Yrok)  येथे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जिंकून महाराष्ट्राची मराठमोळी अभिनेत्री साता समुद्रापार पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माई घाट' एक बायोपिक सिनेमा आहे. ज्यामध्ये एका आईच्या एकुलत्या एक मुलाला पोलिसांकडून छळ करून ठार मारले जाते. आपल्या मुलाच्या मृत्युनंतर त्याला न्याय मिळावा याकरता अनेक दशकांहून अधिक काळ या माऊलीने केलेल्या संघर्षाची ही खरी कहाणी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन असून मोहिनी गुप्ता या त्याच्या निर्माता आहेत.



अभिनेत्री उषा अलीकडेच अरुणा राजे यांच्या फायरब्रँडमध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली होती. सध्या दोन आंतरराष्ट्रीय सिनेमांवर ती काम करत आहे. असाच एक प्रकल्प वेन्टुरा पन्स यांचा आहे. ज्यामध्ये अभिनेत्री उषा एका भारतीय मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो एक नृत्य आणि संगीतमय सिनेमा असून अभिनेत्री उषाने त्यामध्ये स्वतः एक गाणे देखील गायले आहे. 



त्याचबरोबर स्पॅनिश दिग्दर्शक एलेजांड्रो कॉर्टिस यांच्यासह आणखी एक स्पॅनिश चित्रपट ती करीत आहे. अपार कष्ट आणि मेहनतीने यशाची शिखरे गाठून उषाने मराठी मनाचे नाव उंचावले हि खरी वाखाणण्याजोगी गोष्टच म्हणावी लागेल.उषा जाधव मराठी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. 'ट्रॅफिक सिग्नल' या मधुर भंडारकर यांच्या सिनेमातून उषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2012 मध्ये 'धग' या मराठी सिनेमाला उषाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.