Zakir Hussain: तबलावादक न्हवे तर उस्ताद झाकीर हुसेन यांना `या` क्षेत्रात करायचे होते करियर
झाकीर हुसेन तबल्याला जागतिक स्तरावर नेलेच, शिवाय नव्या पिढीच्या संगीतकारांसमोर एक आदर्श निर्माण केला. पण तुम्हाला हे माहित आहे का की, झाकीर हुसेन यांनी दुसऱ्याच क्षेत्रात करियर करायचं ठरवलं होतं.
Zakir Hussain Pass Away: सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. संगीत क्षेत्रात त्यांनी अशी छाप सोडली आहे की त्यांच्या जाण्यानंतरही प्रत्येकाच्या ओठावर त्यांचे नाव राहील. पण तुम्हाला माहित आहे का त्यांना तबलावादक किंवा संगीतकार व्हायचेचं नव्हते. झाकीर हुसेन यांना दुसऱ्याच क्षेत्रात आपले करियर करायचे होते. उस्ताद झाकीर यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय वाद्य वादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.
काय बनण्याचं होतं स्वप्न?
झाकीरने एकदा खुलासा केला होता की त्यांच्या आयुष्यात एक वेळ आणि वय असं होतं जेव्हा त्याचं मन रॉक-एन-रोल संगीताकडे वळले. त्यासाठी ते अमेरिकाला सुद्धा गेले होते. 'रेंडवस विथ सिमी गरवाल' या शोमध्ये झाकीरने आठवण सांगितली होती की, वयाच्या १८व्या वर्षी त्याने तबला वाजवण्याव्यतिरिक्त संगीत करिअरची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती. " मला रॉक-एन-रोल स्टार व्हायचे होते, एका रात्रीत दशलक्ष डॉलर्स कमवायचे होते. मी मुंबईच्या रस्त्यांवर खांद्यावर बूमबॉक्स घेऊन फिरायचो, डोअर्स आणि बीटल्स ऐकत फिरायचो. मला वाटले पैसे कमवण्याचा आणि पटकन प्रसिद्ध होण्याचा हा एकमेव मार्ग आहे".
शास्त्रीय संगीतात करिअर करण्यासाठी प्रेरणा
झाकीर हुसेन हे स्वप्नातलं जग जगण्यासाठी अमेरिका तर गेले पण तिथे त्यांचे दिवस खूप अडचणीत जाऊ लागले. आठवड्याला 25 डॉलरवर जगत होते आणि एकाच भांड्यात भाजी-भाकरी बनवत होते. तो काळ खूप कठीण होता. 'रेंडवस विथ सिमी गरवाल' या शोमध्ये, त्याची पत्नी, अँटोनिया मिनेकोला हिने खुलासा केला की तिने झाकीरला भारतीय शास्त्रीय संगीतात करिअर करण्यासाठी प्रेरित केले होते. त्या म्हणाल्या, "हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण जेव्हा मी स्वत: भारतीय शास्त्रीय संगीत अनुभवले आणि निखिल बॅनर्जीसोबत त्यांना पहिल्यांदा वाजवताना ऐकले तेव्हा मी त्यांना म्हणाले, 'तुम्ही हे संगीत का वाजवत आहात? तुम्ही एक उत्तम शास्त्रीय कलाकार आहात, तुम्ही शास्त्रीय संगीतात करिअर करायला हवे! ते हसत म्हणाले, "मी अनुभव घेत होतो."
उस्ताद झाकीर हुसेन यांचे बालपण कसे होते?
उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या तीसऱ्या वर्षी त्यांच्या वडील आणि प्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा कुरेशी यांच्याकडून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. वयाच्या 11व्या वर्षी पहिला स्टेज शो देखील केला. झाकीरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत असंख्य स्टेज शो केले आहेत. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना तबल्याची साथ केली.
ठरले मोठमोठ्या 5 पुरस्कारांचे मानकरी
पद्मश्री-1988
पद्मभूषण -2002
कालिदस अवॉर्ड -2006
पद्मविभूषण-2023
ग्रॅमी अवॉर्ड-2024