Vaishali Takkar's accused ex-boyfriend Rahul Navlani : अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Takkar) आत्महत्येप्रकरणी धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूर पोलिसांना चौकशी दरम्यान मोठा खुलासा झाला आहे. वैशालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या तिचा एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी (Rahul Navalani) आणि पत्नी दिशा (Disha) यांच्या विरोधात पोलीस लुकआउट नोटीस (Lookout notice) जारी करणार आहे. पण त्यापूर्वीच राहुल नवलानी कुटुंबासह देश सोडून वेळण्याचा तयारीत होता.


एक्स-बॉयफ्रेंड देश सोडून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूर पोलीस (Indore Police) आयुक्तांचं म्हणणं आहे की, राहुल हा शहरातील मोठ्या व्यावसायिकांपैकी एक आहे आणि तो सर्वच बाबतीत संपन्न आहे, त्यामुळे तो देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो. सोबतच या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलीस आणि अनेक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याशिवाय या प्रकरणात आणखी एका संशयितावर पोलिसांना संशय आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी रोहित नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. रोहित हा राहुल नवलानीच्या पत्नीचा भाऊ आहे.


राहुल हा 'डर' मधील शाहरुख खान


वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मात्र, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून पोलिसांकडून होत आहे. याप्रकरणी वैशालीच्या आईचं (Vaishali mother) म्हणणं आहे की, राहुल वैशालीला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. अभिनेत्रीच्या आईच्या म्हणण्यानुसार, राहुलचं पात्र शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डर' (Darr) या चित्रपटासारखं आहे. तो दिसायला फक्त गोड होता पण आतून खूपच धोकादायक होता. या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.