मुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है, ससुराल सिमर का यासह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवलेली वैशाली ठक्करने आत्महत्या केली आहे.  अजूनही अभिनेत्रीच्या आत्महत्येची चौकशी सुरू आहे. मात्र दरम्यान, मध्य प्रदेश पोलिसांनी अभिनेत्रीच्या आत्महत्येबाबत मोठा दावा केला आहे. वैशाली ठक्कर तिचा एक्स बॉयफ्रेंडचा छळ करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरमधील एसीपी एम रहमान म्हणाले, 'आम्हाला तेजाजी नगर पोलिस ठाण्यातून माहिती मिळाली होती की, टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने काल रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. हाती लागलेल्या  सुसाईड नोटमध्ये तणावाखाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सुसाइड नोटनुसार, अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड तिचा छळ करत होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.' वैशाली ठक्करच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.


अभिनेत्रीच्या मृत्यूआधी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या काही व्हिडिओंचीही चर्चा होत आहे. एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं की, ' 'जिसका बंदा/बंदी नहीं है वो भी पंखा घुमाए'. वैशाली ठक्करच्या या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक नव्हतं?
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर रोका सेरेमनीचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तिने एंगेजमेंट झाल्याची माहिती दिली होती. तिने आपल्या भावी पतीचं नाव डॉ अभिनंदन सिंग असंही सांगितलं होतं.  कुटुंबातील काही अगदी जवळचे नातेवाईकच एंगेजमेंटला पोहोचले होते. अभिनंदन हे केनियामध्ये डेंटल सर्जन असल्याचंही सांगितलं जात होतं.


मात्र, एक महिन्यानंतर वैशालीने अभिनंदनसोबत लग्न होत नसल्याचे सर्वांना सांगितलं. दोघांनीही आपलं लग्न रद्द केलं होतं. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रोका सेरेमनीचा व्हिडिओही डिलीट केला होता.


ससुराल सिमर का 2 मध्ये अंजली भारद्वाजची भूमिका साकारण्यासाठी तिला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन पेटल पुरस्कार देखील मिळाला आहे. वैशाली शेवटची 2019 च्या मनमोहिनी शोमध्ये दिसली होती. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, वैशाली ठक्करच्या एका जुन्या मुलाखतीच्या आधारे असं सांगण्यात येत आहे की, तिचं लग्न पुढे ढकलल्यानंतर अभिनेत्रीने कोरोना केसमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं होतं. एका मुलाखतीत वैशाली म्हणाली होती की, 'कोरोनामुळे अनेक लोक आपला जीव गमावत असताना अशा परिस्थितीत मी लग्न करू शकत नाही. पुढच्या वर्षी जर परिस्थिती चांगली झाली तर आम्ही लग्न करू.