Prarthana Behre's Love Story : व्हॅलेन्टाईन वीक सुरु झाला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी ही आठवतेच. कशा प्रकारे आपली लव्ह स्टोरी सुरु झाली आणि आज आपण आपल्या साथीदारासोबत किती सुंदर आयुष्य काढतोय या सगळ्या गोष्टी आठवून आनंदी होतो. दरम्यान, या सगळ्यात आपलं पण कधीतरी हार्टब्रेक झालं असतं. सगळ्यात जास्त हार्ट ब्रेक हे तेव्हा होतात जेव्हा आपला आवडता सेलिब्रिटी हा लग्न बंधनात अडकतो. (Valentine's Special) आज आपण अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचे (Prarthana Behre) लाखो चाहते आहेत. प्रार्थना बेहेरेनं जेव्हा लग्न केलं तेव्हा लाखो मुलांचं हार्ट ब्रेक झाले. कारण तिनं एकदिवस लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. चला तर जाणून घेऊया आपल्या सगळ्यांची लाडकी प्रार्थना बेहेरेची लव्ह स्टोरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रार्थनानं तिच्या लव्ह स्टोरीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. प्रार्थनानं जेव्हा लग्न करण्याचा विचार केला होता तेव्हा तिला जे मुलं आवडतात त्यांच्यासोबत तिनं लग्न बंधनात अडकावं का असा प्रश्न तिला सतावत होता. त्यामुळे याविषयी तिनं तिच्या बहिणीशी चर्चा केली कारण तिची ताई तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तिच्यासोबत असते. यावेळी प्रार्थना ताईला भेटायला जाताना तिला जो मुलगा आवडत होता त्याला सोबत घेऊन गेली. मात्र, त्या मुलाला ताईनं रिजेक्ट केलं. हे पाहता आता आपण अरेंज मॅरेज करू असा निर्णय प्रार्थना घेतला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अशी झाली प्रार्थना आणि अभिषेकची ओळख


प्रार्थना आणि अभिषेकची ओळख ही एका matrimonial site वरून झाली होती. ते दोघं जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हाच अभिषेक प्रार्थनाच्या पसंतीस उतरला होता. ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. भेटण्याआधी त्यांनी 1 ते 2 तास भेटणार असे ठरवले होते. मात्र, ते 5 तास एकमेकांसोबत होते. तेव्हाच अभिषेक प्रार्थनाला आवडला होता. मात्र, पहिल्याच भेटीत प्रार्थनानं अभिषेकला सांगितलं की मला तू आवडला असलास तरी देखील जो पर्यंत माझ्या ताईला तू आवडत नाहीस म्हणजेच ताईनं जर आपल्या लग्नाला होकार देईल तरच आपलं काही होऊ शकतं. त्यानंतर अभिषेक प्रार्थनाच्या ताईला भेटला आणि तो ताईच्याही पसंतीस उतरला. 


हेही वाचा : मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य


पुढे जाऊन अभिषेकनं एकेदिवशी प्रार्थनाला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करायचे ठरवले. अभिषेकनं प्रार्थनाला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुलाब लपवून ठेवले. ही सगळी गुलाबं अभिषेकनं काही तरी कारणं सांगत शोधायला सांगितले. या सगळ्यात त्याला ही विसर पडली की त्यानं नक्की कुठे कुठे गुलाब लपवले आहेत. अभिषेकनं तिच्यासाठी आवडता पॅनकेक मागवला होता. प्रार्थना तिचा आवडता पॅनकेक खात असताना अचानक अभिषेकनं तिला विचारलं की तुझ्याासाठी मी गाणं गाऊ का? खरंतर अभिषेकनं कोणतंही रॅनडम गाणं गायलं नाही तर त्यानं प्रार्थनासाठी स्वत: एक गाणं लिहिलं होतं. हे गाणं गात असतानाच अभिषेकनं प्रार्थनाला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर प्रार्थनानं हसत होकार दिला आणि अवघ्या पहिल्या भेटीपासून पुढच्या चार महिन्यात त्यांनी लग्न केलं. 14 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांनी गोव्यात सप्तपदी घेतल्या.