मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे ऍक्टिव्ह नसते. अनुष्का फार कमी आणि खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. गेल्या काही दिवसांपासून ती अभिनयापासून दूर आहे. दरम्यान अनुष्काने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. महाअष्टमीच्या मुहूर्तावर अनुष्काने मुलगी वामिकाचा एक फोटो शेअर केला. एवढंच नाही तर तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मुलीसाठी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि अनुष्काच्या मुलीच्या नावाचा अर्थ 'दुर्गा' आहे. नवरात्रीत  मुलीचा फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली, 'तू माझा प्रत्येक दिवस अधिक शक्तीशाली बनवत आहेस. आशा करते तुझ्यामध्ये कायम आई दुर्गेचा वास असो... माझी गोड वामिका... हॅप्पी अष्टमी...' सध्या अनुष्काची खास पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 



'वामिका' याचा अर्थ 'शक्ती' आणि 'ताकद' असा देखील होतो. 'वामिका' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'देवी दुर्गा'. तसेच 'वामिका' या नावात विराट आणि अनुष्काच्या नावाचे अक्षर देखील आहे. वामिका या नावात पहिलं अक्षर 'व' आहे. हे तिच्या वडिलांच्या म्हणजे विराट कोहलीच्या नावावरून घेण्यात आलं. यानंतर 'वामिका' नावातील शेवटचं अक्षर 'क' म्हणजे 'का'. हे तिच्या आईच्या म्हणजे अनुष्का शर्माच्या नावावरून घेण्यात आलं आहे.