Vandan Ho Song : संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो आणि हीच परंपरा जपत, संगीत मानापमान या अजरामर नाटकावरून प्रेरीत लवकरच एक वेगळा अनुभव मिळणार आहे. 'संगीत मानापमान' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा एक अप्रतिम टीझर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या सिनेमासोबत रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 'संगीत मानापमान' या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचं लक्षात येत आणि याचीच सुरवात आज चित्रपटाच्या पहिल्या 'वंदन हो' गाण्याने झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कट्यार काळजात घुसली नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना संगीत विश्वातील दिग्गज संगीतकार शंकर महादेवन, गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा आवाजातील तिहेरी संगम अनुभवायला मिळणार आहे. या आधीही ही सुप्रसिद्ध तिकडी एकत्र येऊन गायली होती परंतु चित्रपटातील गाण्यासाठी एकत्र येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.  हल्लीच चित्रपटातील पहिल्या गाण्यासाठी शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी मुंबईतील एका स्टुडिओत वंदन हो हे गाणं शूट केलंय. उत्तम संगीत आणि गीतकार यामुळे सेटवर किती प्रसन्न वातावरण होतं हे नुकतंच सेटवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसलं. आज 'वंदन हो' गाण्यानं सुरवात करुन चित्रपट निर्मात्यांनी नक्कीच कलेची केलेली एक सांगीतिक वंदन आहे. मंत्रमुग्ध करणारं साउंडट्रॅक 'वंदन हो' वैविध्यपूर्ण संगीत शैलींचा कळस आणि परंपरेचा मिश्रण असलेलं हे गाणं चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरेल याची खात्री आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

'वंदन हो'  या गाण्याबद्दल आपलं मत व्यक्त करत संगीतकार शंकर महादेवन म्हणाले की, "माझं सौभाग्य आहे की मला हे गाणं राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सोबत करायला मिळालं, नक्कीच आमच्यासाठी हे एक फेरिटेल आहे, संपूर्ण टीम जरी तीच असली तरी आमचं म्युझिक मात्र, खूप वेगळं आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात अजून भरपूर अप्रतिम गायक आहेत, समीर सावंत यांनी लिरिक्स चित्रपटाच्या गाण्याला दिले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना ही संगीतमय भेट नक्कीच आवडेल."


राहुल देशपांडे म्हणाले की "मला अतिशय आनंद झाला, कट्यारचे दिवस आठवले, शंकरजी खूप मोठे जिनिअस आहेत. त्यांनी खूप छान कंपोझिशन केलय त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजतो." 


इतकंच नव्हे तर महेश काळे यांनी सुद्धा भावना व्यक्त करत सांगितलं की "मानापमानचा हीरो म्हणजे या चित्रपटाची गाणी आहेत. मला खात्री आहे की आमच्या कट्यारच्या या संघाकडून नवीन येणारा संगीत मानापमान चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल."


या चित्रपटात एकूण 14 गाणी आहेत, तर ह्या गाण्यांना 18 दिग्गज गायकांनी गायले आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाला सुरेख संगीत देणारे त्यातले 7 गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. त्यामुळे या चित्रपटाद्वारे सर्वश्रेष्ठ गायकांनी सजवलेली मैफिल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 


हेही वाचा : रश्मिकासोबत अफेयरवर विजय देवरकोंडाचं शिक्कामोर्तब? म्हणाला, '35 वर्षांचा असताना मी...'


चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे साकारणार आहे. तर सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना  कुलकर्णी, निवेदिता सराफ सारखे आणखी दिग्गज कलाकारांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.