Vandana Gupte : सार्वजनिक सेलिब्रिटी दिसले की लगेचच अनेक लोक त्यांच्यासोबत फोटो काढण्यास धावू लागतात. बऱ्याचवेळा आपण कोणत्या कलाकाराला गाडी चालवताना पाहिलं की अनेक लोक त्यांचा व्हिडीओ काढतात. जसं आपल्याला गाडी चालवायला आवडतं त्याच प्रमाणे त्यांना देखील कधीतरी का होईना गाडी चालवणं आवडतं. अशात बऱ्याचवेळा कामाच्या ठिकाणी देखील ते स्वत: ड्राइव्ह करत जातात. यात फक्त बॉलिवूड कलाकार नाही तर मराठी कलाकारही आहेत. पण यावेळी ही कोणती मराठी सेलिब्रिटी आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? अनेकांना हा अभिनेता असेल असं वाटलं असेल पण हा कोणता अभिनेता नसून अभिनेत्री वंदना गुप्ते या आहेत. वंदना गुप्ते यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी गाडी चालवत असताना त्यांनी रिक्षावाल्याला ओव्हरटेक केलं म्हणून त्यानं शिवीगाळ केल्याचा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदना गुप्ते यांनी 'लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना आलेला हा अनुभव सांगितला आहे. या मुलाखतीत वंदना यांना नेहमीच बाईपण भारी कसं असतं? असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न विचारताच वंदना यांनी त्यांना आलेला हा भयानक अनुभव सांगत म्हणाल्या, "आधी मी गाडी खूप वेगाने चालवायचे. त्यात जर एकादी स्त्री ही पुरुषाला ओव्हरटेक करून पुढे गेली की पुरुषांचा अहंकार दुखावतो. मी एकदा नाटकाचा प्रयोग संपवून लिंक रोड मार्गानं माझ्या घरी यायला निघाले. सांताक्रुझ पोलिस ठाण्याजवळून सरळ गेलं की माझं घर होतं. त्या पोलिस ठाण्याजवळच मी एका रिक्षावाल्याला ओव्हरटेक केलं आणि पुढे निघाले. मी ओव्हरटेक केलं म्हणून त्यानं मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करतोय हे पाहताच मी माझी गाडी त्याच्या रिक्षा समोर उभी केली." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यानंतर पुढे काय झालं हे सांगत वंदना गुप्ते म्हणाल्या, "रिक्षासमोर गाडी उभी केल्यानंतर मी गाडीतून उतरले. असं अचानक झालेलं पाहता रिक्षात बसलेले प्रवासीही गडबडले. मी लगेच रिक्षावाल्याला विचारलं मला शिवी का दिली? तेव्हा तो लगेच म्हणाला, तुम्ही मला ओव्हरटेक केलं ना… हे ऐकताच मी त्या रिक्षावाल्यासोबत त्यात बसलेल्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि मला जी टेक्निक माहित होती ती मी वापरली.... आणि ती म्हणजे रिक्षा उलटी कशी करायची. मी रिक्षा उलटी करताच त्यातील ऑईल बाहेर आलं. मी त्याच्याशी वादही घातला असता आणि त्याला पोलिस ठाण्यातही नेले असते. पण त्याचदिवशी रात्री माझी अमेरिकेची फ्लाइट होती त्यामुळे मी त्या रिक्षावाल्याला सोडलं."


हेही वाचा : "...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल


दरम्यान, वंदना गुप्ते यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी,दीपा परब चौधरी,शिल्पा नवलकर,सुकन्या कुलकर्णी मोने आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. तर हा चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.