Vanita Kharat : सध्या सगळेच लोक हे उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहेत. उन्हाळी सुट्टी म्हटली की सगळ्यांना आठवतं ते आपलं गावं. आपल्या सगळ्यांना गावी जायला आवडतं. इतकंच काय तर गावच्या घराची मज्जा ही औरच असते असं म्हणायला हरकत नाही. फक्त सर्वसामान्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील उन्हाळ्याच्या शेवटी आपल्या गावच्या घरी जाण्याचा प्रयत्न हा नक्कीच करतात. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील लोकप्रिय अभिनेत्री आणि कॉमेडीयन वनिता खरात देखील तिच्या गावी गेली आहे. तिच्या गावच्या घराचा फोटो शेअर करत वनितानं तिच्या गावाचं नाव देखील सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून तिच्या गावच्या घराचा फोटो शेअर केला आहे. कोकणातील घराची शानच वेगळी असं म्हणायला हरकत नाही. ती कौलारु घरं आणि त्यासमोर असणारा एक सुंदर वरांडा हे तर प्रत्येकाच्या आवडीचं आहे. 



मुंबईमध्येही तिचं चाळीत घर आहे. आता तिने तिच्या गावच्या घराची झलक दाखवली आहे. वनिताचं देवगड हे गाव आहे. कोकणातलं तिचं हे घर निर्सगाच्या सानिध्यात आहे. तसेच अगदी कौलारु घर विशेष लक्ष वेधून घेणारं आहे. घरासमोर मोठ अंगणही आहे. मुंबईमध्ये वनिता ही चाळीच्या घरातच राहते. तर तिनं शेअर केलेल्या या गावच्या घराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वनितानं शेअर केलेल्या तिच्या घराच्या फोटोतून हे स्पष्ट होत आहे की तिचं हे घर निसर्गाच्या सानिध्यात आहे. त्याच कारण तिच्या घराच्या डाव्या बाजुला आणि मागच्या बाजुला झाडं दिसत आहेत. या फोटोत वनितानं तिच्या गावाचं नाव देखील सांगितलं आहे. देवगड हे वनिताचं गाव आहे. गावच्या या घराचा फोचो शेअर करत गावचं घर आणि रेड हार्ट इमोजी वापरत वनितानं खाली देवगड असं हॅशटॅग दिलं आहे. 


हेही वाचा : Zara Hatke Zara Bachke BO Collection : सारा आणि विकी कौशलच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई


तर वनितानं आज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात एक महिला फणसाचे गरे साफ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत वनिता म्हणाली, Today's Special फणसाची भाजी असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, वनितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आधी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पती सुमित लोंढेसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत वनितानं लग्नाला 4 महिने झाल्याचे सांगितले आहे.