मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदा देखील बॉलिवूड कलाकारांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. दिवाळीनिमित्त अनेक सेलिब्रिटींनी पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र करण जोहरच्या मुलांसाठी म्हणजे यश आणि रुहीसाठी ही दिवाळी अत्यंत खास होती. कारण त्यांची पहिली दिवाळी त्यांनी वरुण धवन, आलिया भट या कलाकारांसोबत साजरी केली. 


'स्टुडेंट ऑफ द ईअर'ला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाची टीम एकत्र आली आणि त्यांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. वरुणनंही करणची लाडकी मुलगी रुहीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये वरुण म्हणतो, "या खोलीतील सर्वात सुंदर मुलीच्या मी प्रेमात आहे."