काय, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्याला करतेय डेट?
काय आहे हा प्रकार
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'हैप्पी फिर भाग जाएगी' या सिनेमानंतर गायब झाली आहे. पण आता सोनाक्षी चर्चेत आहे ते तिच्या पर्सनल लाइफमुळे. दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रानंतर चाहत्यांच्या नजरा सोनाक्षी सिन्हाकडे खिळल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाची चाहत्यांनी घाई आहे.
आतापर्यंत सोनाक्षी सिन्हाचं नाव सोहेल खानची पत्नी सीमा सचदेवच्या लहान भावासोबत म्हणजे बंटी सचदेवसोबत जोडलं गेलं. मात्र याबाबत कधीच सोनाक्षी किंवा बंटी यांनी आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं नाही. हे दोघं कायम एकत्र दिसायचे पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचं कळलं.
सोनाक्षी सिन्हाचा जन्म 2 जून 1987 ला झाला. सोनाक्षी आता 31 वर्षांची आहे. तिचं नाव तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं गेलं आहे. तसेच कॉफि विथ करणमध्ये आलियाने देखील म्हटलं होतं की, सोनाक्षीने आदित्यला डेट करायला हवं. एवढ्यातच आता वरूण धवनने कमेंट करून पुन्हा एकदा या दोघांच्या नावाकडे सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.
वरूण धवनने नुकत्याच सोनाक्षीच्या एका फोटोवर भाभी म्हणजे वहिनी अशी कमेंट केली आहे. यावर सोनाक्षीने रिप्लाय केला आहे की, तू गप्प बसशील. सोनाक्षी आणि आदित्य लवकरच करण जोहरच्या 'कलंक' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात वरूण धवन देखील असणार आहे.
काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने सांगितलं देखील होतं की, ती आदित्यसोबत काम करण्यास सुपर एक्साइटेड आहे. 2009 मध्ये आलेल्या London Dreams या सिनेमातून आदित्यने डेब्यू केलं आहे. त्यानंतर आशिकी 2, दावत ए इश्क आणि फितूर सारख्या सिनेमांमध्ये त्याला पाहिलं आहे.