मुंबई : वरूण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांच नुकतच अलिबागमध्ये लग्न झालं. लग्नानंतर वरूण-नताशाचे वेडिंग आणि प्री वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या हनीमून डेस्टिनेशनबाबत खूप चर्चा झाली. वरूण धवन आणि नताशा दलालच्या नव्या घराबद्दल (Varun Dhawan New Home Video) चर्चा सुरू झाली. एका मुलाखतीत वरूणने हिंट दिल्यामुळे त्याच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरूण धवनने नवं घरं खरेदी केलं तेव्हा त्यांनी लिव-इनमध्ये राहण्याचा विचार केला होता. वरूणने नताशा आणि तिचे कुटुंबिय खूप साधे आहे. काही कालांतराने तुम्ही एकमेकांसोबत राहणं पसंत करतात. 



नताशा आणि मला लिव-इनमध्ये राहण्यास काही हरकत नव्हती. पण आमचे कुटुंबिय या गोष्टीसाठी तयार नव्हते. माझं स्वतःचं घर आहे. मी आता माझ्या पालकांसोबत राहत नाही, असं एका मुलाखतीत वरूणने सांगितलं होतं. 


वरूण धवनने २०१७ मध्ये आपलं नवं घर खरेदी केलं होतं. वरूणचं नवं घर अतिशय सुंदर आणि शानदार आहे. अनुपम खेर यांनी वरूण धवनच्या नव्या घराची होमटूर केली आहे. ज्यामध्ये वरूणने लिव्हिंग रुम, बेडरुम, वर्क डेन, क्लोसेट आणि गेस्टरुमची सफर घडवली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, वरूणचं घर नताशाने डेकोरेट केलं आहे. वरूणचं नवं घर त्याच्या आई-वडिलांच्या जवळचं आहे. नताशाने आपल्या आवडीने आपलं घर सजवलं आहे. वरूणच्या आवडीचा देखील यामध्ये विचार करण्यात आला.